दप्तराविना शाळा, पालिकेचैा उपक्रम
By Admin | Published: November 17, 2016 03:24 AM2016-11-17T03:24:49+5:302016-11-17T03:24:49+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शाळांमध्ये दप्तराविना शाळा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी हा उपक्रम घेण्यात येणार आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शाळांमध्ये दप्तराविना शाळा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी हा उपक्रम घेण्यात येणार आहे. यामुळे मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, अशी माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी दिली.
लहानपणापासूनच अवांतर वाचनाची गोडी लागावी. विद्यार्थ्यांना अभ्यासपूरक विषय मनोरंजक पद्धतीने सांगून अभ्यासाविषयी उत्सुकता निर्माण करणे, या हेतूने पालिका दप्तराविना शाळा हा उपक्रम राबविणार आहे. पालिकेच्या काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम घेण्यात आला. उपक्रमास मुलांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यामुळे पालिकेच्या सर्वच शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे शिक्षण मंडळाने ठरविले आहे. (प्रतिनिधी)