मुळा-मुठेवरील बंधारे झाले कचरापेट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:18 AM2021-02-23T04:18:00+5:302021-02-23T04:18:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कदमवाकवस्ती : पावसाळ्यात पूर्व हवेली तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे कवडीपाट (कदमवाकवस्ती) येथून वाहत असलेल्या मुळा-मुठा ...

The dams on the radish-fist became garbage bins | मुळा-मुठेवरील बंधारे झाले कचरापेट्या

मुळा-मुठेवरील बंधारे झाले कचरापेट्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कदमवाकवस्ती : पावसाळ्यात पूर्व हवेली तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे कवडीपाट (कदमवाकवस्ती) येथून वाहत असलेल्या मुळा-मुठा नदीला पूर आला होता. या पुरामध्ये नदीपात्रालगतची मोठमोठी झाडे उन्मळून पडली. ती वाहून येत ठिकठिकाणच्या बंधाऱ्यांत अडकल्याने पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. ती न काढल्याने तसेच मोठ्या प्रमाणात जलपर्णी आणि कचरा येथे साठल्याने हे बंधारे म्हणजे कचरापेट्या भासत आहे. या मुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कवडी गाव येथील मुळा-मुठा नदी पात्रात कचरा, प्लास्टिक कागद, जलपर्णीमुळे पाणी पुढे जात नाही. तर, पाटबंधारे विभागाकडून ही जबाबदारी जलसंपदा व जलसंधारण खात्याची असल्याचे सांगितले जात आहे.

प्रशासनाच्या या टोलवाटोलवीमुळे हा कचरा सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ नदीपात्र तसेच बंधाऱ्यात अडकून पडला आहे. यामुळे नदीचे पाणी बंधाऱ्यातून जाण्यास अडचण निर्माण होत असल्याने पाणी तुंबून त्याच्यावर जलपर्णी जमा झाली आहे. त्यामुळे मच्छर निर्माण होऊन नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे येथून जातांना तोंड दाबून पुढे जावे लागत आहे. या बंधाऱ्यांची स्वचछता करण्यात यावी अशी मागणी वारंवार करूनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

कोट

दूषित पाण्यामुळे या परिसरात मच्छरांचा उपद्रव होत आहे. रात्रभर गाई- म्हशींच्या गोठ्यात लाकडे जाळून धूप करण्याची कसरत येथील शेतकरी बांधवांना करावी लागत आहे. पूर्वी पुणे शहरातील काही सामाजिक संस्था येथील पक्षी निरीक्षण केंद्राला दर रविवारी भेट देऊन तेथील कचरा गोळा करून साफसफाई करण्याचे सामाजिक काम करत होत्या. पण बंधाऱ्यात अडकलेली मोठमोठी झाडे व जलपर्णी कढण्यात त्या सामाजिक संस्थाही हतबल झाल्या आहेत.

- सोमनाथ गरूड, शेतकरी

Web Title: The dams on the radish-fist became garbage bins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.