नृत्यातून ग्रामसंस्कृ तीचे दर्शन

By admin | Published: September 25, 2015 01:00 AM2015-09-25T01:00:02+5:302015-09-25T01:00:02+5:30

ग्रामीण संस्कृतीतील जागरण-गोंधळ, बहारदार लावणी, मयूरनृत्य, चक्रीनृत्य, धनगरी गजा, शेतकरी गीत, डांग नृत्य अशा लोककलांच्या आविष्काराने पिंपरी-चिंंचवड फेस्टिव्हलची रंगत वाढली.

Dance from the dance form of the village | नृत्यातून ग्रामसंस्कृ तीचे दर्शन

नृत्यातून ग्रामसंस्कृ तीचे दर्शन

Next

पिंपरी : ग्रामीण संस्कृतीतील जागरण-गोंधळ, बहारदार लावणी, मयूरनृत्य, चक्रीनृत्य, धनगरी गजा, शेतकरी गीत, डांग नृत्य अशा लोककलांच्या आविष्काराने पिंपरी-चिंंचवड फेस्टिव्हलची रंगत वाढली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पिंपरी-चिंंचवड फेस्टिव्हलचे उद्घाटन बुधवारी झाले. या वेळी अभिनेता देवदत्त नागे, महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे, तेजश्री अडिगे, राजू गोलांडे, अमित गोरखे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, जयश्री गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेने झाली. त्यानंतर औपचारिक उद्घाटन सोहळा झाला.
अभिनेता नागे म्हणाले, ‘‘शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमामुळेच शहराची संस्कृती टिकून आहे. पिंपरी-चिंंचवड फेस्टिव्हलच्या माध्यमातून ही पर्वणीच आज शहरवासीयांना अनुभवायला मिळत आहे. मी व्यसनापासून नेहमीच दूर राहिलो आहे. म्हणूनच जय मल्हार मालिकेमध्ये ‘खंडेराय’ म्हणून उभा राहू शकलो. आज मी तुमच्या सर्वांकडून व्यसनापासून अलिप्त राहण्याचे वचन मागतो. कोणत्या गोष्टी जवळ करायच्या व कोणत्या गोष्टी नाही, याकरिता ‘इगो’ नको, तर ‘इको फें्र डली’ राहा. तरुणांनो, व्यसन दूर ठेवा.’’
खासदार बारणे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंंचवड फेस्टिव्हलच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांमुळे शहरात उत्सव टिकून आहेत. त्यामुळेच जय मल्हार मालिका घराघरांत पोहोचली आहे, अशा उत्सवात सातत्य हवे.’’ लोकशाहीर जैनू शेख यांनी शिवरायांवर अप्रतिम असा पोवाडा सादर केला, तर सह्याद्री ढोल-ताशा पथकाने विशेष प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. पश्चिम सांस्कृतिक मंत्रालयाच्या ९५ कलाकारांनी कलात्मक बहारदार नृत्याने उपस्थितांचे मनोरंजन केले. यामध्ये गुजराती आदिवासी समाजाचे डांग नृत्याने सर्वांचे डोळे दिपले. आदिवासी समाजातील आवाहनात्मक कलाविष्कार महिला व पुरुषांनी मिळून सादर केले. अंबे, जोगवा दे जागरणगोंधळाचे अप्रतिम सादरीकरण या वेळी करण्यात आले. गोव्याचे पारंपरिक नृत्य, उत्तर प्रदेशाचे मयूरनृत्य, राजस्थानचे चक्रीनृत्य, महाराष्ट्राचे धनगरी समाजाचे नृत्य ‘धनगरवाड्यात घुसला,’ तर ‘पाडाची गं’, लावणी नृत्य वर्षा दरपे यांनी सादर केले. तसेच शेतकरी गीत कलाप्रकारही या वेळी झाला.
राजमुद्रा संस्थेच्या ३५ कलाकारांनी लोककला कलाविष्कार सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. प्रशांत पाटील व संतोष लिंबोरे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक प्रवीण तुपे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Dance from the dance form of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.