लॉकडाऊनमध्ये फार्म हाऊसवर सुरू होता डान्सबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:14 AM2021-04-30T04:14:44+5:302021-04-30T04:14:44+5:30

मुंबईतून आणल्या डान्सर : कुडजे येथे पोलिसांनी टाकला छापा लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून डान्सर ...

The dancebar starts at the farmhouse in Lockdown | लॉकडाऊनमध्ये फार्म हाऊसवर सुरू होता डान्सबार

लॉकडाऊनमध्ये फार्म हाऊसवर सुरू होता डान्सबार

Next

मुंबईतून आणल्या डान्सर : कुडजे येथे पोलिसांनी टाकला छापा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून डान्सर आणून उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फार्म हाऊसवर चक्क डान्स बार सुरू असल्याचे उघडकीस आले. कुडजे गावातील एका फार्म हाऊसवर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून महापालिकेतील रिंगमास्टर ठेकेदारांसह ९ जणांना अटक केली आहे. या ठिकाणी वेश्याव्यवसायही सुरू असल्याचे निष्पन्न झाले असून ५ तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

मंगेश राजेंद्र शहाणे (वय ३२, रा. संतनगर, अरण्येश्वर), ध्वनीत समीर राजपूत (वय २५), निखिल सुनील पवार (वय ३३, रा. पर्वतीदर्शन), समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे (वय ३९, रा. आगळंबे फाटा, कुडे गाव, ता. हवेली), विवेकानंद विष्णु बडे (वय ४२, रा. नवी सांगवी), प्राजक्ता मुकुंद जाधव (वय २६, रा. मिलिंदनगर, सांताक्रुझ, मुंबई), नीलेश उत्तमराव बोधले (वय २९, दोघेही रा. पुरंदर हाऊसिंग सासोयटी, म्हाडा कॉलनी), सुजित किरण आंबवले (वय ३४, रा. बालाजीनगर) आणि आदित्य संजय मदने (वय २४, रा. अंधेरी पुर्व, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

फार्म हाऊस व्यवस्थापक समीर पायगुडे, पार्टीचे आयोजन करणारा विवेकानंद बडे आणि डान्सर मुलींना घेऊन येणारी प्राजक्ता जाधव यांना न्यायालयाने ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींची जामिनावर सुटका केली आहे.

उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुडजे गावात लबडे फार्म हाऊसवर डीजेच्या तालावर तरुणींना नाचवत डान्सबार सुरु होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिसांनी बुधवारी रात्री ११ वाजता तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे मुलीसह डान्स व मद्यप्राशन सुरु होते. त्याठिकाणी ९ जणांना अटक करण्यात आली. यावेळी पाच तरुणींची सुटका करण्यात आली असून तेथे वेश्याव्यवसायही सुरु असल्याचे पोलिसांना आढळून आले.

अटक करणारे हे सर्व पुणे महापालिकेतील ठेकेदार असून काही जण भाजपचे पदाधिकारी असल्याचे समजते.

दरम्यान, पळून गेलेला आरोपी संदीप चव्हाण (रा. वडगाव बुद्रुक, पुणे) आणि लबडे फार्म हाऊसचे मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

लॉकडाऊनमध्ये डान्सबार

सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये एक तरुणी ही पुण्यातील असून इतर ३ तरुणी मुंबई, कल्याण आणि ठाणे येथील आहेत. एक तरुणी मुळची सिलीगुडीची असून ती सध्या मुंबईत राहायला आहे. तिने इतर ४ तरुणींशी संपर्क साधून प्राजक्ता मार्फत या फार्महाऊसवर आल्या होत्या. न्यायालयाच्या परवानगीने त्यांची रवानगी रेस्क्यु फाऊंडेशनला करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमध्ये प्रवास

सध्या लॉकडाऊन सुरु असून प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता आहे. असे असताना या तरुणी मुंबई, ठाणे, कल्याण येथून पुण्यात कशा आल्या, कोणी आणल्या, महापालिकेतील हे ठेकेदार रिंगमास्टर म्हणून ओळखले जातात. त्यांच्यातील एक जण महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील शाखा अभियंता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: The dancebar starts at the farmhouse in Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.