दौंडला विजेचा लपंडाव

By Admin | Published: June 10, 2015 04:43 AM2015-06-10T04:43:09+5:302015-06-10T04:43:09+5:30

दौंड शहरात गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Dandal's lightning scandal | दौंडला विजेचा लपंडाव

दौंडला विजेचा लपंडाव

googlenewsNext

दौंड : दौंड शहरात गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. जर, दौंड शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अजित बलदोटा यांनी दिला आहे. जवळजवळ गेल्या पाच दिवसांपासून दौंड शहर रात्रीच्या वेळेला अंधारात आहे. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाणदेखील वाढलेले आहे.
दिवसभर विद्युत पुरवठा खंडित होतोच. परंतु, रात्री-बेरात्री विद्युत पुरवठा बंद असतो. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर विद्युत मंडळाच्या कार्यालयात दूरध्वनी केला असता, दूरध्वनीचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवलेला असतो. त्यामुळे वीज मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क होत नाही. अधिकारीदेखील जागेवर नसल्याने नागरिकांना मनस्ताप होत आहे. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शालेय प्रवेश सुरू आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यकत्या कागदपत्रांसाठी झेरॉक्सची आवश्यकता असते. मात्र, केवळ विद्युत पुरवठ्याअभावी त्यांची गैरसोय होत आहे. दुसरीकडे उच्च शिक्षणासाठी ईमेलवरून अर्ज पाठविण्याची प्रक्रियाही सुरू आहे. परंतु विद्युत पुरवठा नसल्याने संगणकदेखील बंद असतात. या खंडित विद्युत पुरवठ्याला हैराण झाले आहेत. याचा विचार विद्युत मंडळाने करावा, असे अ‍ॅड. बलदोटा यांनी सांगितले.
(वार्ताहर)

सर्व पक्षीय आंदोलनाची दिशा ठरणार
दौंड शहरातील खंडित वीजपुरवठा साधारणत: ५ ते ७ तासांपर्यंत होत आहे. तर, रात्रीच्या वेळेला संपूर्ण रात्रभर लाईट नसतात. परिणामी, विद्युत महावितरण कंपनीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, याकामी येत्या दोन दिवसांत सर्वपक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार असून, यात आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

असा झाला खंडित वीजपुरवठा
शुक्रवार (दि.५) रोजी संपूर्ण रात्र दौंडच्या नागरिकांनी अंधारात काढली. शनिवारी दिवसभर विजेचा लंपडाव याच दिवशी रात्रीला १0 ला विद्युत पुरवठा खंडीत झाला. तो मध्यरात्री ३ च्या सुमारास आला. रविवार, सोमवार, मंगळवार दिवसभर विजेचा लंपडाव एंकदरितच विद्युत खंडीत पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Web Title: Dandal's lightning scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.