दौैंडला वाढीव घरपट्टीवरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 03:00 AM2017-12-01T03:00:16+5:302017-12-01T03:00:26+5:30

 Dandle increases the house | दौैंडला वाढीव घरपट्टीवरून गदारोळ

दौैंडला वाढीव घरपट्टीवरून गदारोळ

Next

दौैंड : वाढीव घरपट्टीच्या प्रश्नावरून दौैंड नगर परिषदेत गुरुवारी मोठा गदारोळ झाला. करमूल्यांकन निर्धारण अधिकारी शेंडे, टाऊन प्लॅनिंगचे दत्तात्रय काळे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांना शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चांगलेच धारेवर धरले. साधारणत: तीन तासांच्यावर नगर परिषदेत हा गोंधळ सुरू होता.
दौैंड नगर परिषद कार्यालयात वाढीव घरपट्टीसंदर्भात आज सुनावणी ठेवली होती. परंतु,वाढीव घरपट्टी ही सर्वसामान्यांना अन्यायकारक आहे, अशी भावना या वेळी सर्वांनीच मांडल्या. ज्या नागरिकांची घरे छोटी आहेत त्यांना जास्त घरपट्टी तर ज्यांची घरे मोठी आहेत त्यांना कमी घरपट्टी, असा सगळा सावळा गोंधळ आहे. चुकीच्या सर्वेक्षणामुळे हा गोंधळ होत असल्याने ती तातडीने कमी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शिवसेना-भाजपा यांच्यासह सेवाभावी संस्थेनीही यापूर्वी वाढीव घरपट्टी कमी करण्याची मागणी केली होती.
आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजेंद्र खटी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोर्चा काढला. आणि हा मोर्चा नगर परिषदेत कार्यालयात नेला. यावेळी तालुका प्रमुख अनिल सोनवणे, शहरप्रमुख संतोष जगताप, कैलास शहा, आनंद पळसे, अमोल जगताप, शैलेश पिले, प्रसाद कदम, गणेश दळवी, विक्रम इंगवले, अँथोनी निंबाळकर तसेच भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनील शर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्ट मंडळाने उपस्थित अधिकाºयांना घरपट्टी वाढवल्याबाबात जाब विचारला. या वेळेस उपस्थित अधिकाºयांची तू तू-मै मै झाली. अधिकारी सभागृहातून निघून जायला लागले, त्यावेळेस सुनील शर्मा, भाजपाचे शहराध्यक्ष फिरोज खान, नासीर पटेल, सतपालसिंग वालिया, प्रकाश पारदासानी, रोहिणी खेडेकर यांनी सभागृहाचा दरवाजा लावून घेत अधिकाºयांना बाहेर जाण्यास मज्जाव केला. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी यांनी वाढीव घरपट्टीला विरोध केला. यावेळी नगर परिषदेच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणला होता.
राष्ट्रवादीचे गटनेते बादशहा शेख म्हणाले, की वाढीव घरपट्टी ही जाचक असून यासाठी विशेष सभा बोलवून घरपट्टी कमी करण्याचा ठराव घेणार आहे. शिवसेनेच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, शिवसेनेच्या नगरसेविका अनिता दळवी, राष्ट्रवादीचे नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांनी वाढीव घरपट्टीला विरोध करत घरपट्टी कमी झालीच पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा पवित्रा घेतला.
यानंतर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्या सकारात्मक धोरणामुळे आक्रमक झालेले आंदोलक शांत झाले.

वरिष्ठांचा निर्णय अंतिम

वाढीव घरपट्टी कमी करणे, हे माझ्या हातात नाही. यासाठी नगर परिषदेत सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाला पाहिजे. हा ठराव मंजूर झाल्यास मी ठरावाची प्रत जिल्हाधिकारी आणि नगर रचना विभागाला पाठवेन. त्यानंतर वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यानुसार घरपट्टी आकारली जाईल. -अ‍ॅड. विजयकुमार थोरात, मुख्याधिकारी, दौैंड

Web Title:  Dandle increases the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे