पुन्हा एकदा पुराचा धोका, मुठा कालवा फुटीनंतर उद्भवत आहेत प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 02:39 AM2018-09-30T02:39:04+5:302018-09-30T02:39:30+5:30
डायस प्लॉट : कालव्याची भगदाडे, एक वषापूर्वीच समस्येला फोडली होती वाचा
बिबवेवाडी : शहराचा पूर्व भाग व आजूबाजूतील गावांना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी लागणारा पाणीपुरवठा करण्यासाठी कालवा तयार करण्यात आला. हा कालवा अनेक वस्त्या झोपडपट्ट्या यांच्या शेजारून वाहत जातो. परंतु पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळे कालवा फुटून पूरस्थिती निर्माण होऊन शेकडो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लाखो लिटर पिण्याच्या पाण्याचे व शेतीच्या पाण्याचे नुकसान झाले.
हाच कालवा स्वारगेटच्या दिशेने गुलटेकडी येथील डायस प्लॉट झोपडपट्टीच्या शेजारून वाहत जातो. या भागातील कालव्याच्या संरक्षक भिंतीची ठिकठिकाणी पडझड झाली असून, काही ठिकाणी कालव्याच्या भिंतीचा पाया खचून गेला असून अशा खचलेल्या भिंतीतून पाणी झिरपत असल्यामुळे, कालव्याची भिंत कमकुवत होत आहे. त्यामुळे पाटबंधारे खाते व प्रशासनाने वेळीच अशा कालव्यांच्या भिंतीची पाहणी करून त्यावर तातडीने दुरुस्तीचे उपाय करावेत. अन्यथा काल झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. या भागातील कालव्यामध्ये नागरिक बिनधास्तपणे कचरा व निर्माल्य स्वच्छ पाण्यात टाकतात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येते.
गुलटेकडी येथील डायस प्लॉट झोपडपट्टी व नागरी वसाहतीच्या शेजारून वाहत जाणाºया कालव्याच्या भिंतीची झालेली दुर्दशा. मागील वर्षी ‘लोकमत’ने या विषयाला वाचा फोडली होती.(इनसेन्टमध्ये)
झोपलेला पाटबंधारे विभाग
१ कालच्या झालेल्या कालवा फुटीच्या दुर्घटनेनंतर कालव्यात पाणी सोडण्याचे बंद केल्यामुळे कालव्याच्या भिंतीची झालेली धोकादायक परिस्थिती व ठिकठिकाणी पडझड झालेली भिंतीची अवस्था स्पष्टपणे दिसून येत आहे. परंतु पाटबंधारे खाते व प्रशासनाने पुन्हा एकदा कालवाफुटीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट न पाहता वेळीच कालव्याच्या भिंतीची डागडुजी करण्यात यावी, अशी नागरिक मागणी करीत आहेत.
२ मागील वर्षी ५ आॅक्टोबरला या विषयावर लोकमतमधून पाटबंधारे खाते, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी बातमी प्रसिद्ध झाली होती, परंतु पाटबंधाºयाचा हा कालवा ज्या भागातून जातो त्या भागात सत्तारूढ पक्षाचे आमदार व नगरसेवक यांचे संख्याबळ जरी जास्त असले तरी अशा गंभीर प्रश्नांवर त्यांनी कधीच लक्ष घातलेले दिसत नाही. त्यामुळे काल दुर्घटना झालेल्या भागातील नागरिकांचा रोष पत्करावा लागला.