आपल्यासह पती आणि मुलाच्या जीविताला धोका : गौरी गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:07+5:302021-09-09T04:15:07+5:30

शुक्रवारी (दि. ३) कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एंजल हायस्कूल, संभाजीनगर येथे शासकीय योजनेतून कोविड लसीकरण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ...

Danger to the life of husband and child with you: Gauri Gaikwad | आपल्यासह पती आणि मुलाच्या जीविताला धोका : गौरी गायकवाड

आपल्यासह पती आणि मुलाच्या जीविताला धोका : गौरी गायकवाड

Next

शुक्रवारी (दि. ३) कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एंजल हायस्कूल, संभाजीनगर येथे शासकीय योजनेतून कोविड लसीकरण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सुजित सुभाष काळभोर हा लसीकरण केंद्रावर आला व गोंधळ घालून गायकवाड यांना मारहाण करून अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणानंतर माझे कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. सर्व कुटुंबीय दहशतीखाली वावरत आहेत. असे अर्जात नमूद करून जर माझ्यासह पती व मुलाला काही झाले तर त्याला सर्वस्वी सुजित सुभाष काळभोर, ऋषिकेश विद्याधर काळभोर, सुभाष नरसिंग काळभोर, विद्याधर नरसिंग काळभोर, दत्तात्रय नरसिंग काळभोर, करण दत्तात्रय काळभोर, संकेत सुभाष काळभोर, बाबासाहेब बाळासाहेब काळभोर, प्रतिक बाबासाहेब काळभोर व प्रीतम भास्कर काळभोर ( सर्व रा. कदमवाकवस्ती ) हे दहा जण जवाबदार असतील, असे म्हटले आहे.

याचबरोबर सरकारी कामात हस्तक्षेप करून लसीकरण केंद्र बंद केल्याप्रकरणी व सरकारी कामकाज चालू असताना गोंधळ घातल्याप्रकरणी सुजित काळभोर यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच कोणत्या लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून हे कृत्य केले त्याचा तपास करावा, या विषयात गांभीर्याने लक्ष देत आय.पी.सी. तील कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करून कडक शिक्षा करण्यात यावी. व वरील सर्वांपासून मला संरक्षण मिळावे. अशी मागणी त्यांनी केली आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सुजीत काळभोर यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने दुसरे दिवशी जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर दोन दिवसांनी काळभोर यांनी प्रसारमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित केला. त्यामध्ये सरपंच गायकवाड यांच्यासमवेत पप्पू बडदे व इतर काही जण काळभोर यांना हाताने मारहाण करताना दिसत आहेत. काहीएक कारण नसताना आपणास मारहाण केली असे काळभोर यांचे म्हणणे आहे. याची सत्यता पडताळून आपणास न्याय मिळावा, असे काळभोर यांचे म्हणणे आहे.

Web Title: Danger to the life of husband and child with you: Gauri Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.