राज्यमार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:13 AM2021-08-24T04:13:40+5:302021-08-24T04:13:40+5:30

राज्यमार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला धोका शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्यमहामार्गावर साबळेवाडी (ता. खेड) हद्दीत पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत ...

Danger to traffic due to fatal potholes on state highways | राज्यमार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला धोका

राज्यमार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला धोका

Next

राज्यमार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला धोका

शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्यमहामार्गावर साबळेवाडी (ता. खेड) हद्दीत पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. विशेषतः येथील चढ रस्त्यावर पडलेला खोल खड्डा अतिधोकादायक होऊ लागला असून नित्याने अपघात होत आहेत. रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसंदर्भात नागरिकांकडून वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

चाकण-शिक्रापूर हा रस्ता जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन आद्योगिक वसाहतींना जोडत आहे. तसेच मुंबईहून अहमदनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे होत असल्याने बहुतांशी वाहनचालक या मार्गाचा अवलंब करत आहेत. औद्योगिक वसाहतींचा कच्चामाल परराज्यांतून घेऊन येणारी अनेक मोठी वाहने सातत्याने प्रवास करत असतात. मात्र, पावसाने रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले असून वाहतूकदारांसाठी ते जीवघेणे ठरत आहेत.

साबळेवाडी, चौफुला, शेलपिंपळगाव, शेलगाव, भोसे हद्दीत रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत. सध्या अशा खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहतुकीदरम्यान चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहने घसरून पडून अपघात होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने पुढाकार घेऊन रस्त्यावरील धोकादायक खड्डे तत्काळ बुजविण्याची मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

चौपदरीकरण कामापूर्वी खड्डे बुजवा...

चाकण-शिक्रापूर मार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी नुकताच निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे रस्त्याचे चौपदरीकरण होईल. मात्र, या कामाचा शुभारंभ होण्यासाठी किमान तीन-चार महिने कालावधी लागणार आहे. परिणामी चौपदरीकरण कामापूर्वी रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले धोकादायक खड्डे बुजविणे अत्यंत गरजेचे आहे.

फोटो ओळ : साबळेवाडी (ता. खेड) हद्दीत पडलेला खोल खड्डा वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)

Web Title: Danger to traffic due to fatal potholes on state highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.