चिखल, ओसांडणाऱ्या कचराकुंड्या आणि दुर्गंधीचे साम्राज्य ; आरोग्यासाठी धोक्याची घंटा..... !  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 08:25 PM2018-07-12T20:25:11+5:302018-07-12T20:27:08+5:30

पालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी मोहीम राबविली. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप कचराकुंड्या आहेत. त्या वेळच्यावेळी उचलल्या जात नाहीत, त्यामुळे कचराकुंडीतून कचरा ओसंडून वाहत असतो.

danger zone for health due to dirty empire ! | चिखल, ओसांडणाऱ्या कचराकुंड्या आणि दुर्गंधीचे साम्राज्य ; आरोग्यासाठी धोक्याची घंटा..... !  

चिखल, ओसांडणाऱ्या कचराकुंड्या आणि दुर्गंधीचे साम्राज्य ; आरोग्यासाठी धोक्याची घंटा..... !  

Next
ठळक मुद्देऔषध फवारणीची मागणी : पावसाळी साथीच्या रोगांची भीती पावसाळी वातावरणामुळे डेग्यू आणि स्वाइन फ्लूची भीती

हडपसर : रिमझिम पाऊस सुरू झाल्यामुळे काही ठिकाणी दलदल झाली आहे. या पावसाळी वातावरणात सार्वजनिक ठिकाणी तुडुंब भरुन वाहणाऱ्या कचरा कुंड्या ...त्यामुळे परिसरात पसरणारी दुर्गंधी, वाढलेले डास, कीटक यांचे प्रमाण त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचराकुंड्या वेळच्यावेळी उचलून त्याठिकाणी औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 
कचरा आणि दलदल यामुळे डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हडपसर, मगरपट्टा, भीमनगर, वैदूवाडी, साडेसतरानळी परिसरातून दोन कालवे वाहत आहेत. सध्या पाण्याचा प्रवाह बंद असल्यामुळे दोन्ही कालव्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाणगवत आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, काही ठिकाणी मलवाहिनीही कालव्यात सोडल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोकाट कुत्री आणि डुकरांचा वावर वाढला आहे. सार्वजनिक ठिकाणे आणि कालवा कचऱ्याचे आगर बनले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे डास-मच्छरांची उगमस्थानेच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
पालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी मोहीम राबविली. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप कचराकुंड्या आहेत. त्या वेळच्यावेळी उचलल्या जात नाहीत, त्यामुळे कचराकुंडीतून कचरा ओसंडून वाहत असतो. त्या ठिकाणी मोकाट कुत्री, जनावरे आणि डुकरे अन्न शोधण्यासाठी कचरा विस्कटतात. त्यामुळे कचरा रस्त्यावर पसरून हा कचरा नागरी वस्तीमध्ये जात असल्याने नागरिक त्रासले आहेत.
                                              ......................
डेग्यू आणि स्वाइन फ्लूची भीती
पावसाळी वातावरणमुळे स्वाइन फ्लूच्या एच-१ आणि एन-१ विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी जास्त दिवस साठवून ठेवल्यामुळे डेंग्यूचे विषाणू तयार होतात. पावसाळ्यामध्ये गाळमिश्रित पाणी येते. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून पिण्याची गरज आहे
                             ................
अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या ओव्हरफ्लो
पालिका प्रशानाने कचराकुंड्यामुक्त करण्यासाठी घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, उपनगर आणि परिसरात रस्त्यावरील कचराकुंड्या आजही ओसंडून वाहत आहेत. पावसामुळे कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून, स्थानिक नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. वानवडी आणि ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या वादामध्ये नागरिक भरडला जात आहे. 
                           ......................
पावसाळी वातारणात बाहेर पडताना नाक, तोंड बांधून बाहेर पडावे.पाणी उकळून आणि गाळून पिण्यासाठी वापरावे. उघड्यावरील पदार्थ खावू नयेत. मच्छरदाणी वापरावी, आजाबाजूला पाण्याची डबकी साठू देवू नयेत. पाण्याचा निचरा करण्याविषयी प्रशासनाला माहिती द्यावी. मधुमेहाच्या रुग्णांनी जखम झाली, तर त्वरित उपचार करावेत. जखम बरी होईपर्यंत बाहेर गेल्यानंतर जखम ओली होणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मुतखड्यासारखे आजार होण्याची शक्यता असते. कमीत कमी पाच लिटर पाणी पिण्याची गरज आहे.
-डॉ. आशिषकुमार दोषी

Web Title: danger zone for health due to dirty empire !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.