पूल वाहतुकीसाठी धोकादायक

By admin | Published: October 10, 2016 02:23 AM2016-10-10T02:23:26+5:302016-10-10T02:23:26+5:30

जवडी येथील उजनी जलाशयावरील पुलाला संरक्षक कठडे नसल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

Dangerous to bridge traffic | पूल वाहतुकीसाठी धोकादायक

पूल वाहतुकीसाठी धोकादायक

Next

लोणीदेवकर : राजवडी येथील उजनी जलाशयावरील पुलाला संरक्षक कठडे नसल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या पुलावरून कालठण नं.१, गंगावळण, कळाशी, करेवाडी अगोती नं. १, २ या गावांना जाणारा मुख्य रस्ता आहे. या पुलावरून विद्यार्थी बसेस, तरकारी टेम्पो, एसटी बस, इंदापूरला जाणारे विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठी वर्दळ व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची ऊस वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. पुलास संरक्षण कठडे नसल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबतीत अनेकवेळा संरक्षक कठडे बसविण्याची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते.

Web Title: Dangerous to bridge traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.