धोकादायक वीजवाहक तारा दुरूस्तीचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:11 AM2021-07-30T04:11:26+5:302021-07-30T04:11:26+5:30
पपिंपरी पेंढार : पिंपळवंडी येथील वाकीवस्ती या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतात वीजवाहक तारा धोकादायक पद्धतीने लोंबकळत होत्या याबाबतचे ...
पपिंपरी पेंढार : पिंपळवंडी येथील वाकीवस्ती या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतात वीजवाहक तारा धोकादायक पद्धतीने लोंबकळत होत्या याबाबतचे वृत बुधवारी ( दि २८) लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्यामुळए महावितरण कार्यालय खडबडून जागे झाले आणि त्यांनी बातमीच तातडीने दखल घेत वीजवाहक तारा दुरूस्तीचे काम सुरु केले. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी लोकमतचे आभार मानले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळवंडी येथील वाकीवस्ती या ठिकाणी असलेले शेतकरी चंद्रकांत खंडू फुलसुंदर यांच्या शेतात महावितरण कंपणीचा ट्रान्सफॉर्मर असून त्यावरील वीजवाहक तारा धोकादायक पद्धतीने खाली लोंबकळल्या होत्या. लोकमतमध्य बातमी प्रकाशित झाल्यावर त्या तारांच्या दुरुस्तीचे काम दुपारी काम सुरु झाले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला प्रश्न मार्गी लागला. या ट्रान्सफॉर्मर शेजारीच सिंगलफेजचा ट्रान्सफार्मर आहे. त्याचा ट्रान्सफॉर्मर मोठ्या ट्रान्सफॉर्मरवर पडलेला आहे त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकानाहून हलवून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात यावा अशी मागणी चंद्रकांत फुलसुंदर यांनी एका लेखी तक्रार अर्जाद्वारे केली होती. याबाबत महावितरण कंपणीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या पावसाळा सुरु आहे, त्यामुळे हा ट्रान्सफार्मर लगेच हलविता येणार नाही पावसाळा संपल्यानंतर हे काम सुरु करणार असल्याचे सांगितले.