भटक्या कुत्र्यांचा वाढतोय धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:33 AM2018-05-19T01:33:24+5:302018-05-19T01:33:24+5:30

गेल्या काही वर्षांत शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे पुणेकर प्रचंड हैराण झाले आहेत. सकाळी फिरायला जाणाऱ्या, रात्री उशिरा दुचाकीवरून आलेल्या नागरिकांवर ही भटकी कुत्री हल्ला करीत आहेत.

Dangerous dogs are growing | भटक्या कुत्र्यांचा वाढतोय धसका

भटक्या कुत्र्यांचा वाढतोय धसका

Next

पुणे : गेल्या काही वर्षांत शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे पुणेकर प्रचंड हैराण झाले आहेत. सकाळी फिरायला जाणाऱ्या, रात्री उशिरा दुचाकीवरून आलेल्या नागरिकांवर ही भटकी कुत्री हल्ला करीत आहेत. यामध्ये सध्या महिन्याला सरासरी तब्बल ९०० ते एक हजार पुणेकरांना भटकी कुत्री चावा घेत असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आली. शहरातील भटक्या कुत्र्यांचा बदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले कमला नेहरू उद्यानाच्या परिसरात सकाळी फिरायला गेल्या असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. या पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा शहरातील भटक्या कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या वतीने सन २००७मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात आली. त्या वेळी संपूर्ण पुणे शहरामध्ये ४० हजार भटकी कुत्री असल्याचे स्पष्ट झाले होते.
आता ही संख्या तब्बल २ लाखांच्या घरात गेली असल्याचे महापालिकेच्या अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे. शहराचा वाढता विस्तार, रस्त्यावर
टाकाला जाणार कचरा,
या भटक्या कुत्र्यांवर प्रेम
करून त्यांना खाऊ घालणारे नागरिक यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
>कायद्यानुसार अनेक अडचणी
केंद्र शासनाने पाळीव प्राणी कायदा केला आहे. या कायद्यामुळे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणताना अनेक अडचणी येतात. यामध्ये स्तनपान करणारी मादी व पिलांना उचलणे, सहा महिन्यांपेक्षा लहान पिलांना उचलणे, नसबंदी झालेल्या कुत्र्यांना पुन्हा उचलणे, कुत्र्यांना एका जागेवरून दुसरीकडे सोडण्यास बंदी, शहराच्या वेशीबाहेर नेण्यास बंदी आहे. यामुळे नसबंदी करताना व अन्य उपाययोजना करताना अनेक अडचणी येतात.
> शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे; परंतु अनेक वर्षे भटक्या कुत्र्यांची गणनाच झालेली नाही. यामुळे उपाययोजना करताना बंधने येतात. यामुळे आता पुन्हा एकदा लवकच शहरातील कुत्र्यांची गणना करण्यात येणार आहे. तसेच, सध्या दिवसाला सरासरी ७० कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया केली जात असून, ही संख्या ११५ पर्यंत वाढविण्यात येईल.
- डॉ. अंजली साबणे, उपआरोग्य प्रमुख

Web Title: Dangerous dogs are growing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.