शहरातील धोकादायक होर्डिंग उतरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 AM2021-05-31T04:08:19+5:302021-05-31T04:08:19+5:30

पुणे : महापालिकेने जुन्या आणि धोकादायक गॅन्ट्री (जाहिरात होर्डिंग) उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने शहरातील ५० धोकादायक गॅन्ट्री निष्पन्न ...

Dangerous hoardings in the city will be taken down | शहरातील धोकादायक होर्डिंग उतरविणार

शहरातील धोकादायक होर्डिंग उतरविणार

Next

पुणे : महापालिकेने जुन्या आणि धोकादायक गॅन्ट्री (जाहिरात होर्डिंग) उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने शहरातील ५० धोकादायक गॅन्ट्री निष्पन्न केल्या असून, लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

गेल्या वर्षी, हवा आणि पावसामुळे संचेती रुग्णालयाजवळील ओव्हरहेड गॅन्ट्री कोसळली होती. सुदैवाने रस्त्यावर वाहन अथवा नागरिक नसल्याने मोठी दुर्घटना टळली होती. त्यानंतर पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने शहरातील सर्व कमानींची तपासणी आणि सर्वेक्षण केले होते. आकाशचिन्ह विभागाच्या आकडेवारीनुसार, शहरातील विविध परिसरात दोन हजारांपेक्षा अधिक ट्रॅफिक साइन गॅन्ट्री, होर्डिंग्ज आणि जाहिरात होर्डिंग्ज आहेत. त्यापैकी महानगरपालिकेला जवळपास ५० धोकादायक गॅन्ट्री सापडल्या असून त्या १० ते १५ वर्षे जुन्या आहेत.

आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त विजय लांडगे म्हणाले, “सर्वेक्षण करताना आम्हाला आढळले की संरचनेत ५० गॅन्ट्री जुन्या आणि कमकुवत अवस्थेत आढळल्या आहेत. त्या कोसळण्याची शक्यता आहे. म्हणूनच या धोकादायक जुन्या गॅन्टरीज उरतविसाठी आणि ती काढून टाकण्यात येणार आहेत. कमानी उतरविणे आणि उतरविल्यानंतर त्याचे सर्व साहित्य संकलित करुन पालिकेच्या गोडाऊनमध्ये साठवण्यासाठी निविदा काढल्या आहेत.

पालिकेने जवळपास २६ गॅन्ट्री काढल्या आहेत. आणखी २३ गॅन्ट्री काढायच्या आहेत. आकाशचिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतेक धोकादायक व जुन्या गॅन्ट्री पालिकेच्या आहेत. २००८ साली झालेल्या कॉमन वेल्थ गेम दरम्यान बहुतेक गॅन्ट्री उभी केल्या गेल्या. नगर रस्ता, सातारा रस्ता, पौड रोड, बाणेर-बालेवाडी, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, शिवाजी रोड, विमानतळ रस्ता, जुना मुंबई-पुणे रस्ता अशा मुख्य रस्त्यावर या गॅन्ट्री आहेत. २०१८ साली रेल्वे स्थानकाजवळील मंगळवार पेठ भागात होर्डिंग कोसळल्याने चार लोक ठार, तर सात जखमी झाले होते.

ऑक्टोबर २०१८ पूर्वीच्या पालिकेच्या नियमांनुसार होर्डिंग मालकांना लेखापरीक्षण अहवाल दर दोन वर्षांतून एकदा सादर करावे लागतात. तथापि, गेल्या विभागीय परिवहन कार्यालय (आरटीओ) चौकाजवळच होर्डिंग कोसळल्याची घटना घडल्यानंतर, दर सहा महिन्यांनी असे अहवाल सादर करण्याचा निर्णय अनिवार्य करण्यात आला होता.

Web Title: Dangerous hoardings in the city will be taken down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.