रांजणगाव सांडसजवळ पूलावरील प्रवास धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:03 AM2021-08-02T04:03:53+5:302021-08-02T04:03:53+5:30
या पुलामुळे न्हावरे, शिरूर, मांडवगण फराटा, अहमदनगर, श्रीगोंदा या भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाघोली, पुणे या भागात ...
या पुलामुळे न्हावरे, शिरूर, मांडवगण फराटा, अहमदनगर, श्रीगोंदा या भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाघोली, पुणे या भागात जाण्यासाठी या पुलाचा सर्रास वापर होत आहे. साखर कारखान्याची ऊस वाहतूकीबरोबरच शिवाजी नगर एसटी स्थानकावरील बहुतांश एसटीबस या पुलावरून धावतात. इतकी प्रचंड वर्दळ असलेल्या या पुलाचे संरक्षक कठडे गायब झाल्यामुळे पूलासह वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. काही दिवसातच हे रेलींग गायब झाल्यामुळे ते पडले की चोरीला गेले याबाबत शंका निर्माण केली जात आहे. भीमा नदीला पूर आल्यावरही या पुलावरून वाहतकू करणे सोयीचे ठरते मात्र कठडे नसल्याने हा पूल पूर नसतानाही धोकादायक ठरला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभागाने रेलींग बसवावे अशी मागणी सामजिक कार्यकर्ते तुषार जगताप यांनी केली आहे.
रांजणगावसांडस येथील भीमा नदी पुलावरील गायब झालेले रेलींगमुळे धोकादायक बनलेला पूल
310721\151531pun_4_31072021_6.jpg
रांजणगावसांडस येथील भीमा नदी पुलावरील गायब झालेले रेलींगमुळे धोकादायक बनलेला पूल