पुण्यातील जनता वसाहतमध्ये नागरिकांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:04 PM2020-05-29T22:04:48+5:302020-05-29T22:08:27+5:30
पण हा प्रवास करताना एखाद्याचा तोल जर गेला तर ती व्यक्ती कॅनॉलमध्ये पडून तिचा बळी जाऊ शकतो.
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे साईनाथ मंडळाजवळ असलेला नवीन पूल पूर्णपणे बंद केला आहे. तरी काही नागरीक तारेवरची कसरत करत छुप्या रस्त्यांनी ये- जा करत आहेत. पण हा प्रवास करताना एखाद्याचा तोल जर गेला तर ती व्यक्ती कॅनॉलमध्ये पडून तिचा बळी जाण्याची शक्यता आहे . परंतु, नागरिकांना या गंभीर धोक्याची जरा देखील परवा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते बिनधास्तपणे या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र, सध्या कॅनॉल हा पाण्याने पूर्ण क्षमतेने वाहत असून यात कुणी वाहून गेले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.
जनता वसाहतमध्ये वाढते कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता दक्षता म्हणून प्रशासनाने सर्व रस्ते बंद केले आहेत. मात्र लोकांना याचा कोणताही फरक पडलेला दिसत नाही की हे आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी करत आहेत हे काही ठिकाणी पत्रा वाकवून बाहेर पडून नियम धाब्यावर बसवले आहेत .
जनता वसाहत मध्ये १४००० कुटुंब राहतात. तसेच या जनता वसाहत मध्ये सर्वजण हे हातावरचे पोट असलेले आहेत त्या मुळे ह्या ठिकाणी जर कोरोना शिरकाव वाढला तर पुणे शहरावर मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होईल.
...............................
जनता वसाहतीत स्थानिक नगरसेवक,आणि नेते मंडळीचे दुर्लक्ष होत आहे. या गंभीर धोक्यावर लवकर कारवाई करणे आवश्यक आहे ,यावर पोलिसांनी कारवाई करावी.संदीप काळे स्थानिक रहिवाशी दांडेकर पूल -