दहशत माजविणार्‍या बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:57 PM2017-10-07T13:57:04+5:302017-10-07T14:01:01+5:30

जुन्नर तालुक्यातील डिंगोरे परिसरात माजवलेल्या बिबट्याच्या मादीला अखेर शनिवारी (दि. ०७) पहाटे पिंजर्‍यात अडकविण्यात वनविभागाला यश आले.

Dangerous leopard has been robbed by forest department | दहशत माजविणार्‍या बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद

दहशत माजविणार्‍या बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद

Next

पुणे : जुन्नर तालुक्यातील डिंगोरे परिसरात गेली अनेक दिवसापासून दहशत माजवलेल्या बिबट्याच्या मादीला अखेर शनिवारी (दि. ०७) पहाटे पिंजर्‍यात अडकविण्यात वनविभागाला यश आले.
मागील एक महिन्यापासून या बिबट्या मादीने दोन महिलांवरती गंभीररित्या हल्ले केले आहेत, तसेच १० पेक्षा जास्त पाळीव प्राण्यांवरती हल्ला करून त्यांना ठार केले होते. त्यामुळे डिंगोरे परिसरात बिबट्याच्या मादीमुळे दहशत पसरली होती. पाळीव प्राण्यांवर हल्ले करणे, लहान मुलांवर हल्ला करणे अशा घटना या नित्याच्या झाल्या होत्या. नागरिकांना संध्याकाळच्या वेळी बाहेर पडणेही कठीण झाले होते. या बिबट्याला वनविभागाने जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वारंवार केली होती. अखेर वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले. या बिबट्याच्या मादीला पिंजºयात अडकविल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title: Dangerous leopard has been robbed by forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे