सासवड रस्त्यावर धोकादायक खड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:26+5:302021-05-29T04:09:26+5:30
ढमालवाडी व परिसरातील काही सोसायटीचे सांडपाण्याची वाहिनी या ओढ्यात सोडण्यात आल्या आहेत. तसेच येथील नागरिक ओढ्यातच कचरा टाकत असल्याने ...
ढमालवाडी व परिसरातील काही सोसायटीचे सांडपाण्याची वाहिनी या ओढ्यात सोडण्यात आल्या आहेत. तसेच येथील नागरिक ओढ्यातच कचरा टाकत असल्याने सांडपाण्याची वाहिनी तुंबली आहे. त्यामुळे सांडपाण्याच्या चेंबरमधून पाणी बाहेर येत आहे. झाडेझुडपे गवत वाढले आहेत, तसेच कचरा सांडपाणीमुळे पिण्याचे पाण्याच्या वाहिनीमधील पाणीदेखील दूषित झाले आहे. ओढ्यातील दूषित पाणी लगतच्या विहिरीमध्ये झिरपत आहे. त्यामुळे सर्व विहिरीतील पाणीदेखील दूषित झाले आहे.
त्याचप्रमाणे पेट्रोल पंपाशेजारूनच जाणाऱ्या एका साडपाण्याच्या वाहिनीमधील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून दररोज वाहून येत आहे. हे पाणी या खड्डयात साचते. त्यामुळे हा खड्डे किती खोल आहे, हे वाहनचालकांना समजत नाही. रात्रीच्या अंधारात अपघात होत आहेत. दुचाकीवाहने खड्ड्यात आदळत आहेत. त्याचप्रमाणे अवजड वाहनांचेही नुकसान होत आहे. शिवाय यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी या ड्रेनेजच्या पाण्याच्या लाईनची दुरुस्ती करण्यात यावी. रस्त्यावर पडलेला खड्डा दुरुस्त करून वाहतूक सुरक्षित करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
फोटो- हा रस्ता कोणत्या खेड्ड्यातील नाही तर तो पालखी मार्ग सासवड रस्ता आहे. भेकराईनगर येथील त्याची अवस्था. (छायाचित्र-जयवंत गंधाले)