धोकादायक धुरामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:11 AM2021-02-27T04:11:53+5:302021-02-27T04:11:53+5:30

या परिसरात एक मोठी नामांकित शिक्षण संस्था असून बाहेर राज्यातून असंख्य विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी राहत असून त्यांचे वसतिगृह ...

Dangerous smoke plagues civilians | धोकादायक धुरामुळे नागरिक त्रस्त

धोकादायक धुरामुळे नागरिक त्रस्त

Next

या परिसरात एक मोठी नामांकित शिक्षण संस्था असून बाहेर राज्यातून असंख्य विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी राहत असून त्यांचे वसतिगृह याच परिसरात असल्याने संध्याकाळी त्यांनाही या धुराचा नाहक त्रास होत आहे. तसेच मोठे रुग्णालयदेखील परिसरात असल्याने या धुरामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा त्रास होत आहे.

तसेच शाळा, कॉलेज असल्याने या परिसरात हॉटेल्स, स्टेशनरी शॉप व इतर कॉलेजशी निगडित असणारे बरेच व्यवसाय आहेत. संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर बरेच विद्यार्थी या ठिकाणी खरेदी व जेवण करायला या ठिकाणी येतात. परंतु संध्याकाळी येणाऱ्या या धुरामुळे हे विद्यार्थी या व्यवसाय करणाऱ्या दुकानांकडे पाठ फिरवत असल्याने लाखो रुपये खर्च करून उभे केलेले व्यवसाय अडचणीत येत आहेत.

या परिसराच्या जवळ काही खताचे कारखाने व इतर व्यवसायांचे कारखाने असल्याने यांची तपासणी करून या अडचणीतून मार्ग काढावा अन्यथा स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोट

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कारखान्यांची तपासणी करून जर एखादा कारखाना यात दोषी सापडत असेल तर त्वरित त्यांना नोटीस बजावून ही धुराची अडचण दूर करण्यात येईल.

गौरी गायकवाड, सरपंच, कदमवाकवस्ती

Web Title: Dangerous smoke plagues civilians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.