विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

By admin | Published: July 16, 2017 03:43 AM2017-07-16T03:43:27+5:302017-07-16T03:43:27+5:30

लोणीकंद आणि वाघोली परिसरात वाहतूक नियमांची पायमल्ली करत विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करण्यात येत आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला

The dangerous travel of students | विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
लोणीकंद : लोणीकंद आणि वाघोली परिसरात वाहतूक नियमांची पायमल्ली करत विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करण्यात येत आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅन, पॅगो कोणतीही काळजी घेत नसून शाळा प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.
पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली हे गाव शिक्षणाच उपनगर झाले आहे. सर्व नामांकित संस्थेच्या पी. जी. पासून महा विद्यालयपर्यंत शिक्षण देणाऱ्या २९ संस्था असून त्यामधील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सुमारे १८0 बसेस व इतर वाहने मिळून ३५0 आहेत.
वाघोली व परिसरातील गावामध्ये ही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. लोणीकंद बकोरी रोडवरील स्वलक्ष एज्युकेशन सोसायटी संचालित अनुश्री इंग्लिश मीडियम स्कूल पत्र्याच्या शेडमध्ये सुरू करण्यात आले आहे. भरमसाट फी घेणाऱ्या संस्थेत सुविधांचा अभाव आहे. सुमारे ६५0 विद्यार्थी असून त्यास पुरेशी विद्यार्थी वाहतूक व्यवस्था नाही. शाळा शहरापासून दूर माळरानावर आहे. त्यामुळे शाळेच्या वाहतूक व्यवस्थेशिवाय पर्याय नाही. त्यांच्याकडे काही बसेस आहेत. पण त्या अपूर्ण पडत असून इनोव्हा व इंडिया या गाडीमधून १५ ते २0 विद्यार्थ्यांना कोंबले जात आहे. विद्यालयात वाहन समिती नाही. बसमध्ये मदतनीस महिला नाही. गाड्यांमध्ये प्रथमोपचारपेट्यांचाही अभाव आहे. संस्थेचे संचालक लक्ष्मण ढगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचे टाळले.
काही वर्षांपूर्वी शालेय विद्यार्थी वाहतूक धोरण जाहीर केले. त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याची व स्कूलबस चालकाकडून तपासणी करून घेण्याची जबाबदारी शिक्षण विभाग व परिवहन विभागाची आहे. मात्र हेही याकडे दुर्लक्ष करत आहेत.
पुणे शहरालगत नगर रोडवर वाघोलीमध्ये लहान-मोठ्या संस्था आहेत. पण याच्या वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी कोणाची आहे? प्रत्येक ठिकाणी थोडीबहुत वरील प्रमाणे परिस्थिती आहे. शिक्षण संस्था व पोलीस यंत्रणा यांच्याकडून शंभर टक्के या बाबींकडे लक्ष दिले जात नाही.
संस्था चालक विद्यार्थी वाहतुकीचा मलिदा बाहेर जाऊ नये, म्हणून स्वत:च यंत्रणा उभी करत आहे. यातून अवैध स्कूल बस व शालेय वाहतूक करणारी इतर यंत्रणा फोफावली आहे. यास आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पुणे-नगर रस्ता विशेषत: वाघोली भागात रोज वाहतुकीची कोंडी होते. यामध्ये शालेय बस हे एक कारण आहे. वाहतूक समस्याच्या प्रत्येक बैठकांमध्ये हा विषय चर्चेला येतो. संस्था चालकाने वाहतूक नियंत्रणसाठी मनुष्यबळ (वॉर्डन) घ्यावे, असे सुचविले जाते. पण सर्व संस्थाचालक याकडे लक्ष देतात, असे नाही.

माझ्या पाल्याचा मी एका इंग्रजी माध्य. शाळेत प्रवेश घेतला होता. पण त्याचा दीड ते दोन तास वेळ फक्त एक बाजूने जात होता त्यामुळे तो पुरता आळसून जायचा. म्हणून मी गत वर्षी त्याचा प्रवेश रद्द करुन जि.प. शाळा पेरणे येथे घेतला आहे.
- कौस्तुभ गायकवाड, पालक

भारतीय जैन विद्यालय वाघोलीमध्ये स्कूल बस समिती आहे. गाडीमध्ये वाहक मदतनीस, प्रथमोपचार पेटी आहे, पण ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाला उदंड पीक आले आहे. जे वेगवेगळी प्रलोभने दाखवतात पण पालकांनी आपला पाल्य कोणत्या बसमध्ये जातो, तिथे काय सुविधा आहे या बाबत खबरदारी घेतली पाहिजे.
- संतोष भंडारी, प्राचार्य भारतीय जैन संघटना माध्यमिक विद्यालय, वाघोली

Web Title: The dangerous travel of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.