कबुतरांचा धोका पोहोचला महापालिकेत ! पुणेकरांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:43 AM2018-01-31T03:43:46+5:302018-01-31T03:43:55+5:30
गेल्या काही वर्षांत पुणे शहरात कबुतरांची संख्या वाढत आहे. कबुतरांच्या पिसांमुळे श्वसनाचे विकार आणि अस्थमाचे रुग्ण वाढत असलेल्या डॉक्टरांनी केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे.
पुणे : गेल्या काही वर्षांत पुणे शहरात कबुतरांची संख्या वाढत आहे. कबुतरांच्या पिसांमुळे श्वसनाचे विकार आणि अस्थमाचे रुग्ण वाढत असलेल्या डॉक्टरांनी केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे. शहरातील कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापालिकेच्या वतीने तातडीने कबुतरांचा बंदोबस्त करण्याची मागणी सदस्यांनी मंगळवारी झालेल्या मुख्य सभेत केली.
नागरिकांमध्ये असलेले गैरसमज व चुकीच्या प्रथांमुळे कबुतरांना धान्य टाकण्याच्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत शहरातील कबुतरांची संख्यादेखील वाढत आहे. यामुळे नागरिकांना विशेषत: लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांमध्ये श्वसनाचे विकार जडले आहेत. याशिवाय, कबुतरांच्या विष्ठेमुळे फंगस इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच विष्ठेच्या उग्र वासामुळे देखील नागरिक हैराण होत आहेत. याबाबत मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित करून याबाबत महापालिकेने याबाबत तातडीने काही तरी बंदोबस्त करण्याची गरज असल्याची मागणी आहे.
खाद्य देण्याची प्रथा बंद करण्यासाठी जनजागृतीची गरज
४नागरिकांमध्ये कबुतरांना खाद्य देण्याची प्रथा बंद करण्यासाठी महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्याची गरज असल्याचे काही सदस्यांनी सांगितले, तर यावर काही सदस्यांनी महापालिकेने याबाबत निर्णय घेताना पक्षप्रेमीचा अडथळा लक्षात घेऊन सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करून कबुतरांना आळा घालण्याची मागणी केली. यावर महापौर मुक्ता टिळक यांनी आरोग्याधिकाºयांनी अभ्यास करून काय निर्णय घेता येईल, याबाबत माहिती सादर करण्यास सांगितले.