अतिक्रमणांमुळे ओढा धोकादायक
By admin | Published: January 9, 2017 03:19 AM2017-01-09T03:19:29+5:302017-01-09T03:19:29+5:30
सासवड रस्त्यावरील ओढ्यावरील पुलाच्या पात्रात अतिक्रमण झाल्याने ओढा बुजला आहे. दोन्ही बाजूने उतार असल्याने पाणी या रस्त्यावर साठून राहते.
फुरसुंगी : सासवड रस्त्यावरील ओढ्यावरील पुलाच्या पात्रात अतिक्रमण झाल्याने ओढा बुजला आहे. दोन्ही बाजूने उतार असल्याने पाणी या रस्त्यावर साठून राहते. पावसाळ्यात या पुलावर पाणी साचत असल्याने वाहतुकीस अडथळा होतो. अतिक्रमणामुळे ओढ्याचे पात्र बुजत जाऊन ओढा नष्ट होऊ लागला आहे. पाणी साचल्यावर पाणी जाण्यास जागा नसल्याने वाहतुकीस व पादचाऱ्यांना हा ओढा धोकादायक बनला आहे.
भेकराईनगर येथील विठ्ठल पेट्रोलपंपालगतच्या ओढ्यावरील पुलाची दुरवस्था झालेली आहे. या पुलाचे कठडे तुटलेले आहेत. येथील नागरिकांनी या पुलाची कचराकुंडीच केलेली आहे.
या ओढ्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली असल्याने ओढा बुजत आहे. काही ठिकाणच्या बांधकामामुळे ओढ्यातून पाणी कोठे जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरी या ओढ्यातील कचऱ्यामुळे सासवड रस्त्यावर पाण्याचा डोह निर्माण होतो.
या पुलाचे कठडे तुटल्याने रात्रीच्या अंधारात वाहने या ओढ्यात जात आहेत. छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत.