जेवणाची भ्रांत अन् उपासमारीचे चटके
By admin | Published: October 2, 2016 05:28 AM2016-10-02T05:28:39+5:302016-10-02T05:28:39+5:30
‘आम्हाला खूप भूक लागते हो; पण दिवसभर उपाशीपोटीच राहावे लागते..’ ही खंत आहे शासकीय मुलींच्या वरिष्ठ बालगृहातील मुलींची. सकाळच्या वेळी नाश्ता दिल्यानंतर थेट सायंकाळी
- प्रवीण गायकवाड, शिरूर
‘आम्हाला खूप भूक लागते हो; पण दिवसभर उपाशीपोटीच राहावे लागते..’ ही खंत आहे शासकीय मुलींच्या वरिष्ठ बालगृहातील मुलींची. सकाळच्या वेळी नाश्ता दिल्यानंतर थेट सायंकाळी सातला जेवण मिळत असल्याने या मुलींना उपाशीपोटी राहावे लागत आहे. आधीच समस्यांनी वेढलेल्या या बालगृहात जेवणाचीही भ्रांत आणि उपासमारीचे चटके सहन करीत पोटाला पीळ देत या मुलींना जगावे लागत आहे.
बालगृहामध्ये असणाऱ्या मुलींना सकाळी पोह्यांचा नाश्ता केल्यानंतर त्यांना थेट संध्याकाळी सातला जेवण मिळते. मर्यादित जेवण मिळाल्याने त्यांना दिवसभरात व रात्री पुन्हा भूक लागते. मात्र, कुणाकडेच बोलण्याची सोय नाही. त्यामुळे त्यांना भूक मारून मुकाट्याने जगावे लागत आहे. यशस्विनी सामाजिक अभियानाच्या सचिवांनी भेट दिल्यानंतर मुलींनी ही खंत त्यांच्यासमोर व्यक्त केली, तेव्हा ही बाब समोर आली.
समस्यांनी भरलेल्या या बालगृहात सध्या केवळ १२ मुली आहेत. यातील ज्या मुली सातवीपर्यंत आहेत, त्यांना शाळेत शालेय पोषण आहार मिळतो; मात्र दहावीत असणाऱ्या ४ मुलींना शालेय पोषण आहार मिळत नाही. मर्यादित नाश्ता करून मुली सकाळी अर्धपोटी शाळेत जातात.
सुधारणा न झाल्यास आंदोलन
मुलींची ही व्यथा व पोटभर अन्न मिळत नसल्याची व्यथा ऐकून गवारी यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. बालगृहात मुलींना पोटभर अन्नही मिळत नसेल, यावर त्यांचा विश्वासही बसला नाही. त्या म्हणाल्या, ‘‘ज्या वयात (१५ वर्षे) मुलींना सकस आहाराची आवश्यकता असते, त्याच वयात त्यांना उपाशी ठेवले जात आहे ही शरमेची बाब म्हणावी लागेल. इतर मुलींचीही अशीच हेळसांड सुरू असून, विविध समस्यांच्या गर्तेत या मुली जगत आहेत. मात्र, दया येईल तो महिला व बाल कल्याण विभाग कसला? अतिशय संताप आणणारी ही बाब असून त्यात सुधारणा झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा गवारी यांनी दिला आहे.
मुलींनी व्यक्त
केली खंत
दिवसभर आम्हाला खूप भूक लागते हो; मात्र नाइलाजास्तव तसेच
शाळेत बसावे लागते. संध्याकाळी सात वाजता जेवण दिले जाते; पण रात्री पुन्हा भूक लागते.