चाळकवाडीत बिबट्याची दहशत
By admin | Published: February 22, 2017 01:56 AM2017-02-22T01:56:36+5:302017-02-22T01:56:36+5:30
चाळकवाडी येथे सोमवारी (दि. २०) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास येथील एका शेतकऱ्याला तुरीच्या शेतात बिबट्याचा बछडा दिसल्यामुळे
पिंपळवंडी : चाळकवाडी येथे सोमवारी (दि. २०) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास येथील एका शेतकऱ्याला तुरीच्या शेतात बिबट्याचा बछडा दिसल्यामुळे परिसरात बिबट्याची मादी असण्याची शक्यता असल्याच्या भीतीने घबराट पसरली आहे.
येथील शेतकरी आवडाजी आबाजी सोनवणे यांच्या तुरीच्या शेतात एकनाथ बबन कुऱ्हाडे यांना दोन ते अडीच महिने वय असलेला बिबट्याचा बछडा दिसला. या बछड्याच्या जवळपास मादी असल्याच्या शक्यतेमुळे कुऱ्हाडे त्या ठिकाणाहून तत्काळ निघून गेले. या तुरीच्या शेताजवळ उसाचे क्षेत्र असल्यामुळे बिबट्याची मादी याच परिसरात असण्याची शक्यता असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. मागील आठवड्यात रायकरवाडी शिवारात एका मेंढपाळाच्या कळपावर हल्ला करून तीन मेंढ्यांचा फडशा पाडला होता.