दिराचा बलात्कार; नवऱ्याची मारहाण

By admin | Published: April 25, 2016 02:41 AM2016-04-25T02:41:30+5:302016-04-25T02:41:30+5:30

विवाहितेवर दिराने बलात्कार केला. याची तक्रार केली असता नवऱ्यानेही तिला जीवे मारण्याच्या हेतूने विवस्त्र करून मारहाण केली.

Dare rape; Husband's assault | दिराचा बलात्कार; नवऱ्याची मारहाण

दिराचा बलात्कार; नवऱ्याची मारहाण

Next

इंदापूर : विवाहितेवर दिराने बलात्कार केला. याची तक्रार केली असता नवऱ्यानेही तिला जीवे मारण्याच्या हेतूने विवस्त्र करून मारहाण केली. बेशुद्धावस्थेत रात्रभर रानात सोडून तो निघून गेला. तिच्या भावाने तिला शोधून काढले. आज (दि. २४) तिने दिराविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे ही घटना घडली. या प्रकारानंतर दीर फरारी झाला आहे.
पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, मारहाण करून डाळिंबाच्या रानात सोडून दिलेल्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
सविस्तर हकीकत अशी : शुक्रवारी (दि. २२) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दिर गायकवस्तीवर आपल्या भावाच्या घरी आला. भावजयीला स्वयंपाक करावयास सांगितले.
तिच्या दोन्ही मुलांना दुकानातून खायला घेऊन या, म्हणून घराबाहेर पिटाळले. घराचा दरवाजा आतून बंद केला. पीडित भावजयीच्या तोंडात पदराचा बोळा कोंबून बलात्कार केला. या प्रकाराची बाहेर वाच्यता केली तर मुलीला पळवून नेईन. तिची इज्जत घेऊन, तिला मारून टाकीन, अशी धमकी देऊन तो तेथून निघून गेला.
या प्रकारानंतर ती विवाहिता तक्रार देण्यासाठी इंदापूर पोलीस ठाण्याकडे निघाली असताना, पोलीस ठाण्याच्या अलीकडे बाबा चौकात आरोपीने तिला गाठले.
धमकी देऊन माघारी पाठवले. काल (दि. २३) संध्याकाळी सात वाजता नवरा घरी आल्यानंतर घडलेल्या प्रसंगाबाबत ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करीत असताना, काहीही ऐकून न घेता नवऱ्याने तिलाच बेदम मारहाण केली.
अशी फिर्याद दिल्यामुळे इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार संजय नीलपत्रेवार तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Dare rape; Husband's assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.