संकष्टी चतुर्थीला मंदिराबाहेरूनच ‘दगडूशेठ’चे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:48+5:302021-04-01T04:10:48+5:30

पुणे : संकष्टी चतुर्थीला भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता दगडूशेठ गणपती मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ ...

Darshan of 'Dagdusheth' from outside the temple on Sankashti Chaturthi | संकष्टी चतुर्थीला मंदिराबाहेरूनच ‘दगडूशेठ’चे दर्शन

संकष्टी चतुर्थीला मंदिराबाहेरूनच ‘दगडूशेठ’चे दर्शन

Next

पुणे : संकष्टी चतुर्थीला भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता दगडूशेठ गणपती मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला. त्यामुळे भाविकांनी रस्त्यावरूनच गणरायाचे दर्शन घेतले. तर, अनेकांनी ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्विटर या माध्यमांद्वारे ऑनलाईन पद्धतीने दर्शनाचा लाभ घेतला.

महाराष्ट्रासह पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून संकष्टी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्यात आले होते. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी पार पडले. खबरदारी म्हणून नुकत्याच झालेल्या अंगारकी चतुर्थीला देखील मंदिर बंद ठेवण्यात आले होते. तसेच इतर दिवशी भाविकांना सॅनिटायझेशन, तापमान तपासणी व इतर खबरदारी घेऊन प्रवेश दिला जात आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले की, दर महिन्याला संकष्टी चतुर्थीला शहर व उपनगरांतून हजारो भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून बुधवारी मंदिर बंद ठेवण्यात आले. संकष्टी चतुर्थीसह इतरही दिवशी भक्तांकरिता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील.

Web Title: Darshan of 'Dagdusheth' from outside the temple on Sankashti Chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.