चित्रप्रदर्शनातून घडले भारतीय संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:10 AM2021-03-18T04:10:59+5:302021-03-18T04:10:59+5:30

आर्ट मॅजिक क्लासेसच्या वतीने १४ व्या आर्ट मॅजिक कलाप्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालन येथे केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध ...

Darshan of Indian culture through painting | चित्रप्रदर्शनातून घडले भारतीय संस्कृतीचे दर्शन

चित्रप्रदर्शनातून घडले भारतीय संस्कृतीचे दर्शन

Next

आर्ट मॅजिक क्लासेसच्या वतीने १४ व्या आर्ट मॅजिक कलाप्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालन येथे केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध चित्रकार उल्हास वेदपाठक, ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार, आर्ट मॅजिकच्या संचालिका महालक्ष्मी पवार आणि संयोजक अंबादास पवार, कृतिका कामदार, सागर दारवटकर, ईश्वरी मते, यज्ञेश हरिभक्त, रेहान बाबुडे या वेळी उपस्थित होते.

प्रदर्शनात कॅनव्हासवर संगीत, नृत्य आणि वारली चित्र तसेच आफ्रिकन जीवनशैली धाग्यांनी साकारण्यात आलेली चित्रे आहेत. मोर, घुबड, चिमण्या, पोपट अशा पक्ष्यांचे साकारलेले गोल्डन पेंटिंग,तसेच डेंटी पावडरचा वापर करुन विविध वस्तूंची चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. पेन्सिल, गवत, काड्या, रेझीन यांचा वापर करुन काढलेली चित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

महालक्ष्मी पवार म्हणाल्या, पाच वर्षांच्या मुलापासून साठ वर्षांच्या चित्रकारांची चित्रे या प्रदर्शनात आहेत, हे या प्रदर्शनाचे वेगळेपण आहे. मोझॅक ग्लास पेटिंग, कॉफी पेटिंग, ऑइल, अ‍ॅक्रेलिक, कलर पेन्सिल,चारकोल, पोट्रेट या माध्यमातील विविध चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवार, दिनांक १९ मार्चपर्यंत सकाळी ११ ते ८ या वेळेत प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे.

Web Title: Darshan of Indian culture through painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.