श्री हरिश्चंंद्र मंदिरातील दुर्मिळ पंचलिंगांचे दर्शन
By admin | Published: January 11, 2017 01:49 AM2017-01-11T01:49:30+5:302017-01-11T01:49:30+5:30
ग्रामदैवत श्री हरिश्चंद्र महादेव मंदिरातील दुर्मिळ अशा पंचलिंगांचे दर्शन व महारुद्राभिषेक असा कार्यक्रम नुकताच झाला. पुरातन व ऐतिहासिक पार्र्श्वभूमी असलेल्या
घोडेगाव : ग्रामदैवत श्री हरिश्चंद्र महादेव मंदिरातील दुर्मिळ अशा पंचलिंगांचे दर्शन व महारुद्राभिषेक असा कार्यक्रम नुकताच झाला. पुरातन व ऐतिहासिक पार्र्श्वभूमी असलेल्या या मंदिरातील पिंडीच्या खाली सुमारे अडीच फुटावर पंचलिंग आहेत. सुमारे चार वर्षांनंतर पिंडीवरील शाळुंका काढून या पंचलिंगाला महारुद्राभिषेक करण्यात आला. या पंचलिंगाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.
डोंगरात कोरलेले व एका मोठ्या विहिरीवर उभे असलेले हे मंदिर जुन्या दगडी शिल्पकलेचा एक अप्रतिम ठेवा आहे. या मंदिरात असलेल्या शिवलिंगाच्या बाजूला जिवंत पाण्याची दोन कुंड आहेत. या कुंडातून शिवलिंगावर सतत पाणी येत असते. शिवलिंगाच्या खाली अंदाजे अडीच फूट खोल पाच लिंग आहेत. राजा हरिश्चंद्र फिरत असताना येथे आले. त्यांनी खोल दगडात पाच लिंग ठेवली, येथून पुढे श्री हरिश्चंद्र महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रांग होती. दर्शन संपल्यानंतर पुन्हा विधिवत पूजा करून मुख्य शिवलिंगावरील शाळुंका बसविण्यात आली आणि ही पाच लिंगे झाकण्यात आली. या कार्यक्रमाचे यजमान सखाराम पाटील काळे व बाळासाहेब दरेकर हे होते, पौराहित्य रवींद्र मुद्गल यांनी केले.