सह्याद्री क्लासिक स्पर्धेत दशरथ जाधव आणि डॉ. चंद्रकांत हरपळे यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:36+5:302021-01-25T04:12:36+5:30

देशभरातील १४६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वाईपासून स्पर्धा चालू होते. पसरणी घाट महाबळेश्वरपर्यंत ३० किलोमीटर, तेथून तापोळा घाट ...

Dashrath Jadhav and Dr. in Sahyadri Classic competition. Success of Chandrakant Harpale | सह्याद्री क्लासिक स्पर्धेत दशरथ जाधव आणि डॉ. चंद्रकांत हरपळे यांचे यश

सह्याद्री क्लासिक स्पर्धेत दशरथ जाधव आणि डॉ. चंद्रकांत हरपळे यांचे यश

Next

देशभरातील १४६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वाईपासून स्पर्धा चालू होते. पसरणी घाट महाबळेश्वरपर्यंत ३० किलोमीटर, तेथून तापोळा घाट दोन वेळा आणि परत महाबळेश्वरला येवून आंबेनळी घाट पोलादपूरला जावून परत महाबळेश्वर येथे स्पर्धेचा शेवट होतो. चार घाट मिळून तब्बल चार हजार मीटरचे ईलेव्हेशन आणि २०२ किलोमीटर अंतर स्पर्धकांना १४ तासांत पूर्ण करायचे होते. पहाटे पाच वाजता सुरू झालेली स्पर्धा संध्याकाळी सात वाजता संपली.

हडपसरचे उद्योजक सायकलपटू दशरथ जाधव आणि फुरसुंगीचे डॉ. चंद्रकांत हरपळे यांनी निर्धारित वेळेपेक्षा एक तास आधी स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेत प्रथमच सहभागी होऊन १३ तासांपेक्षा कमी वेळात स्पर्धा पूर्ण करणारे हडपसरचे पहिलेच सायकल वीर ठरले. अतिशय खडतर परिस्थितीत पहिल्याच प्रयत्नात दोघांनी स्पर्धा पूर्ण करुन हडपसरचे नाव उज्ज्वल केले.

नियमित व्यायाम, आठवड्यातून तीन वेळा राईड आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तयार करतात असे दशरथ जाधव यांनी सांगितले. १५ ऑगस्ट रोजी अस्थाना कझाकिस्तान येथे होणाऱ्या ‘फुल आयर्न मॅन’ स्पर्धेत आम्ही सहभागी होणार आहोत. त्यादृष्टीने आमचा सराव चालू आहे असे डॉ. चंद्रकांत हरपळे यांनी सांगितले.

फोटो : महाबळेश्वर येथे पार पडलेल्या सह्याद्री क्लासिक मास्टर्स स्पर्धेत हडपसरचे सायकलपटू दशरथ जाधव आणि डॉ. चंद्रकांत हरपळे यांनी निर्धारित वेळेपेक्षा एक तास आधी स्पर्धा पूर्ण करुन यश मिळविले.

Web Title: Dashrath Jadhav and Dr. in Sahyadri Classic competition. Success of Chandrakant Harpale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.