डेटा चोरून मागितली खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:14 AM2019-02-24T00:14:24+5:302019-02-24T00:14:31+5:30
व्यापाऱ्यात भीती : सायबर पोलिसांत तक्रार; मेलवरून संगणक हॅक
नारायणगाव : कॉम्प्युटरमधील डेटा अचानक गायब होतो़ नंतर स्क्रिनवर फक्त एकच मेसेज येतो़ ‘तुमचा सर्व डेटा आमच्याकडे आहे, तो सुरक्षित हवा असल्यास, आम्हाला बीटकॉईनमध्ये पेमेंट पाठवा़,’ अशा प्रकारे खंडणीची मागणी होत असल्याने व्यापारीवर्गात खळबळ माजली आहे़ दरम्यान, याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्याकडे एका व्यापाºयाने लेखी तक्रार केली आहे़ पोलीस ठाण्याकडून पुढील चौकशीसाठी सायबर क्राईमकडे सर्व माहिती पाठविण्यात आली आहे़
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील एक प्रा ़लि; कंपनी व एक होलसेल-रिटेल औषध विक्रेते अशा दोन प्रतिष्ठित व्यापाºयांचे कॉम्प्युटरमधील अकौंटचा संपूर्ण डेटा अचानक गायब झाला़
या डेटामध्ये १५ ते २० वर्षांपासूनची सर्व आर्थिक देणे-घेणेबाबत व्यवहाराची माहिती होती. कॉम्प्युटरवर काम चालू असताना अचानक स्क्रिन बंद होऊन सर्व माहिती हॅक झाली़ नंतर कोणतेही अकौंट दिसत नव्हते़ याचवेळी स्क्रिनवर मेसेज आला, ‘तुमचा सर्व डेटा आमच्याकडे आहे, तो सुरक्षित हवा असल्यास, आम्हाला बीट कॉईनमध्ये पेमेंट पाठवा,’ असा मेसेज आला़ या स्क्रिनवर कोणताही नंबर नाही, तर फक्त ईमेल अॅड्रेस दिलेला असून या ईमेल अॅड्रेसवर संपर्क साधण्याचा मेसेज होता़
या व्यापाºयांनी सॉफ्टवेअर कंपन्यांशी संपर्क साधला; परंतु त्यांना हॅक झालेला डेटा रिकर्व्हर करता आला नाही़ अनेक दिवस प्रयत्न करून त्यांनी बॅकअप घेतलेला चालू वर्षाचा डेटा उपलब्ध झाला, परंतु जुना डेटा उपलब्ध न झाल्याने या व्यापाºयांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे़ बीट कॉईनमध्ये किती व कशी रक्कम टाकावी, याबाबतचा उल्लेख केलेला नाही़
एका बीट कॉईनची किंमत २ लाख ७९ हजार २६२ रुपये असल्याने या व्यापाºयांनी ईमेल अॅड्रेसवर संपर्क साधरण्याचे टाळले. ग्रामीण भागातही व्यापाºयांच्या कॉम्प्युटरचा डेटा हॅक करून खंडणी मागण्याचा प्रकार सुरू झाल्याने व्यापारीवर्गात खळबळ माजली आहे़ दरम्यान, डेटा हॅक झालेल्या औषधे विक्रेत्याने नारायणगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे़ नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी या तक्रारीची दखल घेऊन पुढील चौकशीसाठी सायबर क्राईमकडे माहिती पाठविली आहे़