शहरात आजपर्यंत ५ लाख व्यक्तींना झाली कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:10 AM2021-09-25T04:10:52+5:302021-09-25T04:10:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत शहरात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या ५ लाखांच्या वर गेली असून, ...

To date, 5 lakh people in the city have contracted corona | शहरात आजपर्यंत ५ लाख व्यक्तींना झाली कोरोनाची लागण

शहरात आजपर्यंत ५ लाख व्यक्तींना झाली कोरोनाची लागण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत शहरात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या ५ लाखांच्या वर गेली असून, आतापर्यंत ५ लाख ८० पुणेकरांना कोरोनाने गाठले आहे; पण यापैकी तब्बल ९७.८८ टक्के व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली असल्याचे मोठे समाधानकारक चित्र पुणे शहरात आहे.

शहरात आतापर्यंत ३३ लाख २२ हजार ७५३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ८० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी केवळ ९ हजार १४ जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांशी रुग्ण हे अन्य आजरानेही ग्रस्त होते. आतापर्यंत ४ लाख ८९ हजार ४८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १ हजार ५८१ इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १२१ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहे. आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ५०९ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.४२ इतकी आहे, तर आज दिवसभरात १७४ कोरोनामुक्त झाले आहेत, तर ५ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़

शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही १८३ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २४८ इतकी आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

-----------------

Web Title: To date, 5 lakh people in the city have contracted corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.