तारीख ठरली! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते होणार चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 09:27 AM2023-07-15T09:27:40+5:302023-07-15T09:29:10+5:30

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

Date fixed! Union Minister Nitin Gadkari will inaugurate the flyover at Chandni Chowk | तारीख ठरली! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते होणार चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण

तारीख ठरली! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते होणार चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण

googlenewsNext

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. १४) चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामास भेट देऊन पाहणी केली. उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करावे आणि उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीच्या दृष्टीने पाटील यांनी चांदणी चौक येथे भेट दिली.

पाटील यांच्या भेटीवेळी प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दीपक पोटे, अमोल बालवडकर, माजी नगरसेविका अल्पना वर्पे आदी उपस्थित होते.

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात उड्डाणपूल, सेवा रस्ता उभारण्यात येत असून, सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रकल्प संचालक संजय कदम यांनी यावेळी पालकमंत्री पाटील यांना दिली.

उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना :

पुणेकरांसाठी चांदणी चौक हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचे उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करावे. त्यासोबतच कामात कोणतीही त्रुटी राहू नये, याची खबरदारी घ्यावी. पावसाची शक्यता लक्षात घेऊन, उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: Date fixed! Union Minister Nitin Gadkari will inaugurate the flyover at Chandni Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.