ग्राहक आयोगाकडून तक्रारदारांना जूनमधील तारखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:51+5:302021-04-27T04:11:51+5:30

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील न्यायालयीन कामकाजाच्या कमी करण्यात आलेल्या वेळेमुळे प्रलंबित दाव्यांची संख्या वाढली आहे. ग्राहक आयोगाच्या ...

Dates in June from the Consumer Commission to the complainants | ग्राहक आयोगाकडून तक्रारदारांना जूनमधील तारखा

ग्राहक आयोगाकडून तक्रारदारांना जूनमधील तारखा

Next

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील न्यायालयीन कामकाजाच्या कमी करण्यात आलेल्या वेळेमुळे प्रलंबित दाव्यांची संख्या वाढली आहे. ग्राहक आयोगाच्या सुनावणींवर देखील परिणाम झाला असून, या महिन्यात सुनावणी असलेल्या तक्रारदारांना थेट जून किंवा त्यानंतरच्या महिन्यातील तारखा देण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमावलीनुसार राज्य ग्राहक आयोगातील प्रत्यक्ष सुनावणी सप्टेंबर महिन्यात बंद करण्यात आली. त्यामुळे सप्टेंबर २०२० महिन्यातील दाव्यांच्या सुनावणीला डिसेंबर २०२० पासून मार्च २०२१ मधील तारखा देण्यात आल्या होत्या. हीच गत आता जिल्हा आयोगातील तक्रारींबाबत झाली आहे. त्यामुळे तक्रारदारांना न्याय मिळण्यास विलंब होत आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सध्या न्यायालयांचे कामकाज ऑनलाइन सुरू आहे. मात्र त्यातील तांत्रिक अडचणींमुळे सुनावणीवर परिमाण होत आहे. सध्या केवळ तात्काळ प्रकरणांवर सुनावणी घेतली जात आहे.

न्यायालयीन कामकाज सुरू ठेवण्याबाबत जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार सध्या आयोगाचे कामकाज सुरू आहे. तक्रारींच्या सुनावणीला जून व त्यानंतरच्या तारखा देण्यात आल्या आहेत. राज्य आयोगात महत्त्वाचे दावे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दाखल करून घेतले जात आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर प्रत्यक्ष सुनावणी पुन्हा सुरू होईल असे कन्ज्युमर ॲॅडव्होकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष ज्ञानराज संत यांनी सांगितले.

Web Title: Dates in June from the Consumer Commission to the complainants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.