MPSC Exam: एमपीएससीच्या वयोमर्यादाबाबत पुढील बैठकीत निर्णय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 08:16 PM2021-10-13T20:16:59+5:302021-10-13T20:20:29+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (mpsc exam dates) कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत झाल्या नाही. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे

dates mpsc exam ashok chavan commented maharashtra public service commission | MPSC Exam: एमपीएससीच्या वयोमर्यादाबाबत पुढील बैठकीत निर्णय होणार?

MPSC Exam: एमपीएससीच्या वयोमर्यादाबाबत पुढील बैठकीत निर्णय होणार?

Next

पुणे : कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) परीक्षा दोन वर्षात झाल्याच नाही. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा पार झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आगामी आयोगाच्या होणाऱ्या परीक्षांमध्ये दोन वर्षांची अतिरीक्त संधी मिळावी. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. बुधवारी (दि. १३) रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. पुढील बैठकीत अंतिम पण सकारात्मक निर्णय आपेक्षित असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी ट्वीट करत माहिती दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत झाल्या नाही. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे यातील हजारो विद्यार्थ्यांची वयोमर्यादा पार झाली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी संभ्रमात आहेत. ज्यांची वयोमर्यादा संपत आली आहे. त्यांना आणखी दोन वाढीव संधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) द्यावी, अशी मागणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, नुकतीच खासदार संभाजीराजे छत्रपती आणि एमपीएससी समन्वय समिती तसेच परीक्षेची विद्यार्थ्यांनी केलेली आहे.

Web Title: dates mpsc exam ashok chavan commented maharashtra public service commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.