दत्त देवस्थान मुळे शहाजीनगर परिसराच्या वैभवात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:09 AM2020-12-25T04:09:28+5:302020-12-25T04:09:28+5:30
श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त शहाजीनगर ( रेडा ) येथील दत्त देवस्थान येथे, गुरुचरित्र पारायणाची सुरुवात ग्रंथपुजा तसेच विनापुजन राज्याचे माजी ...
श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त शहाजीनगर ( रेडा ) येथील दत्त देवस्थान येथे, गुरुचरित्र पारायणाची सुरुवात ग्रंथपुजा तसेच विनापुजन राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि.२३ ) करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, देवस्थानचे प्रमुख तानाजीराव गायकवाड, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव देवकर, तसेच निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ऍड. तानाजीराव देवकर, ज्येष्ठ नेते किसनराव देवकर, चेअरमन राजेंद्र देवकर, हरीदास देवकर, पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सोमनाथ ढोले उपस्थित होते.
पहाटेची श्रींची महापुजा व अभिषेक इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते व प्रवीण देवकर व मोनिका प्रवीण देवकर -पाटील या उभयतांच्या हस्ते पार पडली. तर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. डी. गेंगे यांच्या हस्ते धूप पूजा पार पडली.
मागील १८ वर्षांपासून अखंड हरिनाम दत्त देवस्थान मुळे होत असते. परंतु यंदा कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दत्त देवस्थान, दत्त जन्मोत्सव विस्तृत न साजरा करता, साध्या पद्धतीने विधिवत पूजन, प्रबोधन या माध्यमातून साजरा करण्याचा निश्चय केला आहे. ही गोष्ट आनंददायी असल्याचे पाटील यांनी सांगितले.
२४ इंदापूर