बेल्ह्यात दत्ता जयंती साध्या पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:11 AM2020-12-31T04:11:53+5:302020-12-31T04:11:53+5:30
अनेक ठिकाणी दत्त मंदिरात सकाळी देवास अभिषेक, पुजा व होमहवनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंदिर फुलांची सजविलेले होते. तसेच ...
अनेक ठिकाणी दत्त मंदिरात सकाळी देवास अभिषेक, पुजा व होमहवनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंदिर फुलांची सजविलेले होते. तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.उत्कष्ट रांगोळ्या मंदिरासमोर काढण्यात आल्या होत्या.सायंकाळी दत्तजन्मानिमित्त मंदिरात भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या जयघोषाने व टाळमृदंगाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेले होते. श्री दत्त जन्म सोहळा कार्यक्रमात दत्त जन्मानंतर पाळणा गायन, देवभेट, सुंठवडा वाटप व आरतीचा कार्यक्रम झाला.अनेक ठिकाणी दत्त मंदिरात भाविकांना खिचडी वाटप व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. देवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी कमीच होती. काही ठिकाणी मंदिरात सकाळचे कार्यक्रम झाल्यानंतर भाविकांना लांबुनच दर्शनासाठी सोय करण्यात आली होती.
दत्तमंदिरासमोर काढलेल्या आकर्षण रांगोळ्या दिसत आहेत.तसेच दत्तजन्माचे वेळी भजन करताना दिसत आहेत.
३० बेल्हा