राजगुरुनगरमध्ये दत्त जयंती उत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:48+5:302020-12-23T04:08:48+5:30
सोमवारी सकाळी आठ वाजता अभिषेक व महापूजा, गायत्री महायज्ञ , प्रेमध्वज पुजन सायंकाळी पाच वाजता श्रींच्या प्रेमध्वजाची मिरवणूक व ...
सोमवारी सकाळी आठ वाजता अभिषेक व महापूजा, गायत्री महायज्ञ , प्रेमध्वज पुजन सायंकाळी पाच वाजता श्रींच्या प्रेमध्वजाची मिरवणूक व दत्त मंदिर येथे ध्वजारोहण होणार आहे. मंगळवारी ( दि. २९) सकाळी श्रींची महापूजा व मंत्रजागर ,दुपारी संगीत भजन, तर सायंकाळी दत्त जन्मावर ह.भ.प. विठ्ठल महाराज गुंडाळ ( बीबी ) यांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर श्री दत्तजन्म सोहळा साजरा केला जाणार आहे. रात्री पालखी ग्रामप्रदक्षिणा, भजन , आरती व प्रसाद असे कार्यक्रम होणार आहे. बुधवारी ( दि.३०) दुपारी दत्त विश्वस्त मंडळाचे भजन, सामूहिक मंत्रजप ,आरती व महाप्रसाद असे कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.
कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष प्रताप आहेर, उपाध्यक्ष जगन्नाथ कुंभार, अजित डोळस, नथुराम तनपुरे, रवींद्र जोशी, पांडुरंग साळुंखे, श्रीमती कमल पिसाळ, प्रभाकर जाधव, अशोक दुगड आदी करत आहेत.
राजगुरुनगर एसटी आगारातील दत्तमंदिरात एसटी अवधूत मंडळाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे दत्त जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त गुरुचरित्र पारायणास प्रारंभ झाला असून गुरुचरित्राची प्रत मंडळाच्या वतीने देण्यात येत आहे. रुद्राभिषेक, पुजा , आरती , महाप्रसाद आदी कार्यक्रम प्रतिवर्षीप्रमाणे होणार असल्याची माहिती चिंतामण गोसावी यांनी दिली. येथील कार्यक्रमाचे संयोजन आगार व्यवस्थापक रमेश हांडे, पांडुरंग शिंदे, चिंतामण गोसावी, रमेश तापकीर, नंदकुमार पवार, सुभाष रत्नपारखी , भारत वाबळे आदी करत आहेत. .