पिंपरी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:25 PM2018-05-08T18:25:22+5:302018-05-08T18:25:22+5:30

दत्ता साने यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म असून ते आक्रमक नगरसेवक म्हणून परिचित आहेत.

Datta Sane opposition leader in Pimpri Municipal Corporation | पिंपरी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने

पिंपरी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने

googlenewsNext
ठळक मुद्देविरोधी पक्षनेते बहल यांनी एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर शनिवारी राजीनामा दिला

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते नगरसेवक दत्ता साने यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची नोंदणी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे ३६ नगरसेवक आहेत.पिंपरी महापालिकेच्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे केवळ ३६ नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पाहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने तगडा मोहरा असलेल्या योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. त्याचवेळी प्रत्येकवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्यात येणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. १७ मार्चला २०१८ रोजी विरोधी पक्षनेतेपदी बसलेल्या बहल यांनी एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर शनिवारी राजीनामा दिला होता. बहल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी चिखलीतील ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतची नोंदणी आज पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.  दरम्यान, महापौर नितीन काळजे यांनी साने यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्याचे पत्र दिल्यानंतर त्यांची अधिकृत नियुक्ती होईल.
दत्ता साने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म असून ते आक्रमक नगरसेवक म्हणून परिचित आहेत.

Web Title: Datta Sane opposition leader in Pimpri Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.