Gram Panchayat Election: दत्तात्रय भरणेंचे इंदापुरमधील १८ ग्रामपंचायतीवरील वर्चस्व ‘लाईव्ह’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 05:50 PM2022-12-25T17:50:16+5:302022-12-25T17:50:33+5:30

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भाजप राष्ट्रवादीमध्ये सरपंच आणि सदस्य निवडीवरुन वादंग

Dattatray Bharne dominance over 18 Gram Panchayats in Indapur Live | Gram Panchayat Election: दत्तात्रय भरणेंचे इंदापुरमधील १८ ग्रामपंचायतीवरील वर्चस्व ‘लाईव्ह’

Gram Panchayat Election: दत्तात्रय भरणेंचे इंदापुरमधील १८ ग्रामपंचायतीवरील वर्चस्व ‘लाईव्ह’

Next

कळस : इंदापुर तालुक्यात नुकत्याच झालेल्या २६ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १८ ग्रामपंचायतीवर वर्चस्व रविवारी(दि २५) आमदार दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या निवासस्थानी ‘लाईव्ह’ केले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भाजप राष्ट्रवादीमध्ये सरपंच आणि सदस्य निवडीवरुन वादंग झाले आहे. या पार्श्वभुमीवर भरणे यांच्या भरणेवाडी निवासस्थानी नुतन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ओळख परेड पार पडली.

यावेळी  नुतन सरपंच व सदस्यांचा फेटा बांधुन पारंपारीक पध्दतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार भरणे म्हणाले, २४६ पैकी १६० सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे निवडून आले आहेत . तालुक्यात अनेक ठिकाणी पक्षाच्याच स्थानिक नेत्यांमध्ये निवडणूक झाली. मात्र पक्षाच्या विचाराच्या १८ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये काही ठिकाणी सरपंच आपला नसला तरी सदस्य बहुमताने आपलेच निवडून आले आहेत. सुमारे १६० ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहेत. जे माझ आहे, त्यालाच माझ म्हणतो. त्यामध्ये आयुष्यात कधी खोटे बोलुन श्रेय लाटण्याचा माझा स्वभाव नाही. विरोधकांनी ग्रामपंचायतीची खोटी आकडेवारी सांगितल्याने इंदापुर तालुक्यातील लोकांमध्ये उद्रेक झाला. त्यामुळेच आजची गर्दी झाली. तालुक्यातील लोकांना ग्रामपंचायतींची खोटी आकडेवारी सांगून वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना दोन वेळा जनतेने घरी बसविले आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. आपण स्वत: मंजुरी आणलेले रस्ते, जलजीवन मिशनची कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादीच्या, अजितदादांच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामे खेचून आणली. इंदापुर सहकारी साखर कारखाना, निरा भीमाची काय अवस्था आहे,वजनात पाप करण्याचा प्रयत्न केला गेला, निरा भीमा तीन तास बंद असल्याचा आरोप भरणे यांनी केला.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सहकारी संस्थांच्या राजकारणावरुन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. दुधसंघ, सहकारी साखर कारखाने तोट्यात असुन आमच्या ताब्यात द्या, आम्ही चालवून दाखवतो असे आव्हान दिले. इंदापुर तालुक्यात अडीच वर्षात दत्तात्रय भरणे यांनी कोट्यावधींची विकास कामे खेचुन आणली. विरोेधकांकडे १९ वर्ष मंत्रीपद होते. या काळात त्यांनी किती विकासनिधी आणला, याचा विचार करण्याची गरज आहे. त्यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्यात साधे सभासद करुन घेत नाही. त्यांचे लबाडीचे राजकारण आहे. तालुक्यात १८ ग्रामपंचायती वर राष्ट्रवादीचे वर्चस्व असुन, एक संमिश्र आहे, असे असताना विरोधक उलटे चित्र दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका गारटकर यांनी केली.

...त्यांचे नेते सुध्दा यांना वैतागले आहेत

विरोधकांचा संभ्रम करण्याचा प्रयत्न आहे. अशा लोकांपासुन सावध रहा. मुंबई,नागपुरला सगळीकडे पुढ पुढ करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न सुरु आहे. त्यांचे नेते सुध्दा यांना वैतागले आहेत, असा टोला आमदार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला. विरोधकांनी खोटे बोल, रेटुन बोलण्याचा प्रकार लावला आहे. विरोधकांना जशतेशी काही देणेघेणे नसल्याची टीका आमदार भरणे यांनी केली.

Web Title: Dattatray Bharne dominance over 18 Gram Panchayats in Indapur Live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.