स्वारगेट घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा कार्यकर्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:27 IST2025-02-27T13:26:41+5:302025-02-27T13:27:56+5:30

माझा फोटो डीपीला ठेवला म्हणून तो माझा कार्यकर्ता होत नाही. असे म्हणत कटके यांनी आरोपीशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले

Dattatray Gade the accused in the Swargate incident is an activist of Shirur MLA Dnyaneshwar Katke | स्वारगेट घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा कार्यकर्ता

स्वारगेट घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा कार्यकर्ता

पुणे : सराईत गुन्हेगाराने परगावी निघालेल्या एका तरुणीला धमकावून शिवशाही बसमध्ये तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात मंगळवारी सकाळी घडली. तरुणीवर बलात्कार करून पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांची आठ पथके शोध घेत आहेत. दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६, रा. शिक्रापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात एक खळबळजनक माहिती समोर येऊ लागली आहे. गाडेचे शिरूरच्या राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या बॅनरवर गाडेचा फोटो असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासोबतचे अनेक फोटोही समोर आले आहेत. यासंबंधी कटके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीचा आणि माझा कसलाही संबंध नाही. त्याने माझा फोटो डीपीला ठेवला म्हणून तो माझा कार्यकर्ता होत नाही. असे म्हणत कटके यांनी आरोपीशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

दत्तात्रय गाडे याच्या व्हॉट्सअप डीपीवर कटके यांचा फोटो आहे. हा फोटोतून कटके यांच्यासोबत अनेक कार्यक्रमात अथवा सत्कार करतेवेळी गाडेचा फोटो दिसून आला आहे. त्याने या आमदारांसोबत निवडणुकीच्या वेळी प्रचार केल्याचे दिसते आहे. गाडेचे राजकारणी, पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आल्याने अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. 

नेमकं प्रकरण काय?  

तरुणी सकाळी साडेपाचच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात आली. ती फलटणला निघाली होती. ती बसची वाट पाहात थांबली असताना गाडेने तिला हेरले. त्याने ताई फलटणची बस येथे लागत नाही, पलीकडे लागते, असे तिला सांगितले. मात्र, पीडितेने मी नेहमीच येथून बसते असे म्हणत पलीकडे जाण्यास नकार दिला. त्यावर त्याने मी इथे गेली दहा वर्षे काम करत आहे, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर तिला स्वारगेट - सोलापूर शिवशाही बसजवळ नेले. तेथे गेल्यावर तिने बसमध्ये अंधार दिसत असल्याचे सांगितले. यावर गाडेने रात्रीची बस असल्याने प्रवासी लाइट बंद करून झोपले असल्याचे सांगितले. पाहिजे तर मोबाइलची लाइट लावून बघून ये, असे तो म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवत तरुणी बसमध्ये चढली. ही संधी साधत गाडेने मागोमाग येत तिचा गळा आवळला. यानंतर तिला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. या घटनेने तरुणीला मोठा धक्का बसला होता. तिने खाली आल्यावर एक प्रवाशाला गाडेने केलेल्या कृत्याबद्दल माहिती दिली. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर तरुणी काही वेळाने आलेल्या फलटणच्या बसमध्ये बसून निघून गेली. दरम्यान, प्रवासात अस्वस्थ वाटत असतानाच तिने मित्राला फोन करून घटना सांगितली. मित्राने धीर दिल्यावर ती सातारा येथून पुन्हा माघारी फिरून स्वारगेटला आली. तेथे येऊन सकाळी नऊच्या सुमारास तिने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Web Title: Dattatray Gade the accused in the Swargate incident is an activist of Shirur MLA Dnyaneshwar Katke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.