'रिकामटेकडी मंडळी मी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे...' हर्षवर्धन पाटलांवर दत्तात्रय भरणे बरसले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 03:51 PM2023-03-13T15:51:15+5:302023-03-13T15:52:52+5:30

विरोधकांनी नेहमीप्रमाणे फुकटचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड सूरू केलीये

Dattatraya Bharane critisize Harshvardhan patil on indapur developing work | 'रिकामटेकडी मंडळी मी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे...' हर्षवर्धन पाटलांवर दत्तात्रय भरणे बरसले

'रिकामटेकडी मंडळी मी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे...' हर्षवर्धन पाटलांवर दत्तात्रय भरणे बरसले

googlenewsNext

बारामती : इंदापुर तालुक्यातील जवळपास २६ किमी रस्त्यांसाठी तब्बल १९.४१ कोटी मंजूर झाले आहेत. मात्र,या मंजुरीनंतर विरोधकांनी नेहमीप्रमाणे फुकटचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड सूरू केली आहे. सध्या हर्षवर्धन पाटलांची 'सुंभ जळाला तरी पीळ कायम' या म्हणी सारखी अवस्था झाली आहे, अशी टीका माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.

भरणे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात हा टोला लगावला आहे. भरणे पुढे म्हणाले,त्यांना नाकर्तेपणामुळेच जनतेने घरी बसविले आहे. मात्र अधिकार नसताना सुद्धा ते सारखे कशातही लुडबुड करून चमकोगिरी करत असल्याचे सांगत भरणे म्हणाले की, खरे तर सध्या त्यांचा विश्रांतीचा काळ आहे. त्यामुळे तालुक्याचा आमदार म्हणून मी जो विकासनिधी खेचून आणत आहे, तो त्यांनी पाहत बसावा. त्यांना निधी मंजूर करण्याचा कसला अधिकार नाही,अशी रिकामटेकडी मंडळी मी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून राजकीज पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असल्याची टिका भरणे यांनी केली आहे.

तसेच तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामे मंजूर करण्यासाठी मी सक्षम असून,‘ए तो ट्रेलर है,पिक्चर अभी बाकी है’ असे सांगत येणाऱ्या काळात यापेक्षा मोठा निधी आपल्याला प्राप्त होणार असल्याचे सुतोवाच करत भरणे यांनी विकासकामांसाठी आपण खंबीर आहोत. विरोधकांनी स्वत:चे साखर कारखाने नीट चालवून शेतकऱ्यांना वेळेवर ऊसबिले देण्यासाठी लक्ष द्यावे ,असा टोला शेवटी पाटील यांना लगावला आहे. 

...या रस्त्यांना मिळाली मंजुरी

 तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सर्व हे रस्ते मंजुर झाले आहेत. जांब-उध्दट-मानकरवाडी-कर्दनवाडी रस्ता (लांबी८.०० कि.मी)- रक्कम रू ५.७९ कोटी व बावडा-शेटफळ हवेली रस्ता(लांबी ६.६००कि.मी)-रक्कम रू५.३३ कोटी. तसेच प्रजिमा-६५ न्हावी ते काळोखे वस्ती-मारकड वस्ती ते लोणी देवकर औद्योगिक वसाहत रस्ता.ग्रा.मा.९(लांबी २े४५० कि.मी)-रक्कम २कोटी ८ हजार रू,रा.म.९६५जी ते कारंडेमळा निमसाखर रस्ता (लांबी २े४७०कि.मी.)-रक्कम १.४६ कोटी,प्रजिमा १७० बोरी ते खंडोबा मंदिर-जोरी वस्ती हनुमान वस्ती ते काझड रस्ता(लांबी२े४०० कि.मी)-रक्कम रू२.१७कोटी आणि रा.म.९६५ जी ते तरंगवाडी ते बुनगेवस्ती,आंबेमळा रस्ता (लांबी ३े७३०किमी )-रक्कम रू २.६६ कोटी .

Web Title: Dattatraya Bharane critisize Harshvardhan patil on indapur developing work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.