बिरदवडीच्या सरपंचपदी दत्तात्रय गोतारणे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:35+5:302021-03-20T04:10:35+5:30

बिरदवडी ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक अधिकारी सुधाकर महांकाळे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सरपंचपदासाठी दत्तात्रय गोतारणे यांचाच एकमेव ...

Dattatraya Gotarane unopposed as Sarpanch of Biradwadi | बिरदवडीच्या सरपंचपदी दत्तात्रय गोतारणे बिनविरोध

बिरदवडीच्या सरपंचपदी दत्तात्रय गोतारणे बिनविरोध

Next

बिरदवडी ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक अधिकारी सुधाकर महांकाळे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सरपंचपदासाठी दत्तात्रय गोतारणे यांचाच एकमेव अर्ज आल्याने, त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा महांकाळे यांनी केली. निवडणूक प्रसंगी सभागृहात रोकडोबा महाराज ग्रामविकास पॅनलचे प्रमुख व माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोहन पवार, अनिता फडके, मंगल पवार व दत्तात्रय गोतारणे असे चार जण उपस्थित होते.

ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी सरपंचपद अनुसूचित जाती करिता राखीव होते. निवडणुकीनंतर झालेल्या आरक्षणात सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला पडले. निवडणुकीत तर अनुसूचित जाती पुरुष निवडून आला होता. त्यामुळे २४ फेब्रुवारी, २०२१ रोजी सरपंचपदाची निवडणूक न होता, फक्त उपसरपंचपदाची निवडणूक झाली. काळूराम किसन जाधव यांची उपसरपंचपदी निवड होऊन सरपंचपद रिक्त राहिले. त्यानंतर, दत्तात्रय गोतारणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करीत आरक्षणाची वस्तुस्थिती मांडली. जिल्हाधिकारी यांनी आदेश करीत महिला आरक्षण रद्द करून पुरुष आरक्षणाचा आदेश दिला. त्यामुळे सरपंचपदी दत्तात्रय गोतारणे यांची निवड बिनविरोध झाली.

निवडणूक प्रसंगी रोहिदास काळडोके, एकनाथ आनंदराव पवार, जितेंद्र फडके, अनिल रेटवडे, आकाश भगत, रमेश लांडे, सचिन काळडोके, दत्ता परदेशी, अर्जुन एकनाथ फडके, रघुनाथ केदारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

१९ अंबेठाण

Web Title: Dattatraya Gotarane unopposed as Sarpanch of Biradwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.