ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची मुलगी झाली मंचरची सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:11 AM2021-02-10T04:11:35+5:302021-02-10T04:11:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मंचर: मंचर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायतमध्ये काम करणारे देविदास राजगुरू यांची कन्या किरण राजगुरू यांची बिनविरोध ...

The daughter of a Gram Panchayat employee became the Sarpanch of Manchar | ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची मुलगी झाली मंचरची सरपंच

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची मुलगी झाली मंचरची सरपंच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मंचर: मंचर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायतमध्ये काम करणारे देविदास राजगुरू यांची कन्या किरण राजगुरू यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, उपसरपंचपदी माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांचे नातू युवराज प्रल्हाद बाणखेले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मंचर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, लोकनेते माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांचा गट यांनी मिळून निवडणूक लढविली. तीनही पक्षाच्या महाविकास आघाडीने १७ पैकी १६ जागा जिंकल्या होत्या. एका ठिकाणी अपक्ष विजयी झाला. ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती महिला या जागेसाठी आरक्षित आले होते. प्रभाग क्रमांक ४ मधून किरण देविदास राजगुरू या एकमेव अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून विजयी झाल्याने त्यांची सरपंचपदी निवड निश्चित होती. उपसरपंचपद राष्ट्रवादी किंवा बाणखेले गटाला मिळणार होते. ग्रामपंचायत सभागृहात सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक कालेकर व सहाय्यक के. डी. भोजने यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. सरपंचपदासाठी किरण देविदास राजगुरू यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांना सदस्य सतीश अरुण बाणखेले हे सूचक होते. उपसरपंच पदासाठी उत्सुकता होती. मात्र, या जागेसाठी युवराज प्रल्हाद बाणखेले यांचा एकमेव अर्ज आला. त्यांना ग्रामपंचायत सदस्य ज्योती निघोट या सूचक झाल्या. सरपंच, उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडले गेल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी कालेकर यांनी केली. नवनिर्वाचित सरपंच किरण राजगुरू व उपसरपंच युवराज बाणखेले यांचा सत्कार सुनील बाणखेले, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, अविनाश रहाणे, साईनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष गिरीश समदडिया, रामदास बाणखेले, मंगेश बाणखेले, प्रवीण मोरडे, संजय बाणखेले, अश्विनी शेटे, अरुण लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य विशाल मोरडे, दीपाली थोरात, सुप्रिया राजगुरव, वंदना बाणखेले, सविता शिरसागर, श्याम थोरात, रंजना आतार, पल्लवी थोरात, ज्योती थोरात, ज्योती बाणखेले, कैलास गांजाळे, अरुण बाणखेले, माणिक गावडे आदी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, नवनाथ नाईकडे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

बॉक्स

मंचर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कन्या सरपंचपदी विराजमान झाली आहे. मागील ३५ वर्षांपासून मंचर ग्रामपंचायतमध्ये काम करणारे देविदास राजगुरू यांची किरण राजगुरू ही कन्या आहे. सध्या कार्यालयीन प्रमुख या पदावर काम करणारे देविदास राजगुरू यांचे अभिनंदन अनेक जण करत होते. शिवसेना ग्राहक मंचाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू यांची सरपंच किरण राजगुरू ही पुतणी आहे. लोकनेते माजी खासदार स्व.किसनराव बाणखेले यांचे नातू युवराज बाणखेले हे उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आले असून अण्णांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

Web Title: The daughter of a Gram Panchayat employee became the Sarpanch of Manchar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.