Pune Crime | मेहुण्याकडून दाजीवर कोयत्याने हल्ला; दापोडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 17:37 IST2023-02-21T17:37:23+5:302023-02-21T17:37:33+5:30
शिवीगाळ करत कोयता डोक्यात मारून केले जखमी...

Pune Crime | मेहुण्याकडून दाजीवर कोयत्याने हल्ला; दापोडीतील घटना
पिंपरी : रागाने माहेरी गेलेल्या बायकोला आणण्यासाठी गेलेल्या दाजीला त्याच्या मेहुण्याने शिवीगाळ करत कोयता डोक्यात मारून जखमी केले. ही घटना रविवारी (दि.१९) सिद्धार्थनगर, दापोडी येथे घडली. या प्रकरणी सचिन एकनाथ वाघमारे (वय ३२, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नागनाथ शंकर कांबळे (५०) राकेश नाथनाथ कांबळे (२१, दोघे रा. दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीने स्वयंपाक केला नाही, या कारणाने फिर्यादी यांनी त्यांना मारहाण केली. यामुळे त्या रागाने माहेरी निघून गेल्या. फिर्यादी हे त्यांना आणण्यासाठी गेले असता आरोपी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ का करता याची विचारण केली असता राग आल्याने फिर्यादी यांना हाताने मारहाण करत डोक्यात कोयता मारून जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.