पुणे-नगर रस्त्यावरील कासारी फाटा येथील अपघातात सासऱ्यासह सुनेचा मृत्यू; वाहनचालक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 04:42 PM2018-02-05T16:42:51+5:302018-02-05T16:47:36+5:30

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या कासारी फाटा येथे अपघातात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास या रस्त्याने जाणाऱ्या सून व सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. 

daughter-in-law died along with her father-in-law at Kasari Phata, on Pune-Nagar road accident; The driver absconded | पुणे-नगर रस्त्यावरील कासारी फाटा येथील अपघातात सासऱ्यासह सुनेचा मृत्यू; वाहनचालक फरार

पुणे-नगर रस्त्यावरील कासारी फाटा येथील अपघातात सासऱ्यासह सुनेचा मृत्यू; वाहनचालक फरार

Next
ठळक मुद्देनोकरीच्या निमित्ताने पुणे येथे राहत मृत दत्तात्रय भुजबळअपघातानंतर कार चालक कार तेथेच सोडून झाला फरार

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या कासारी फाटा येथे अपघातात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास या रस्त्याने जाणाऱ्या सून व सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. 
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी व फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार मृत दत्तात्रय भुजबळ हे नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे राहतात. आज सकाळी दत्तात्रय भुजबळ हे त्यांच्या सुनेसह त्यांच्या एम एच १२ के एक्स ०७६३ या दुचाकीहून बीड येथे चालले होते. आज सकाळी भुजबळ हे पुणे नगर रस्त्याचे कडेला दुचाकी लाऊन एका हॉटेल जवळ थांबले. त्यांनतर चहा घेऊन त्यांच्या दुचाकीजवळ जाऊन दुचाकीवर बसत असताना भरधाव वेगाने आलेल्या एम एच १४ सि एक्स ७१४२ या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, व त्यांनतर कार काही अंतरावर असलेल्या शेजारील झाडावर जाऊन आदळून थांबली. यावेळी दुचाकीवरील दत्तात्रय भुजबळ व मोहिनी भुजबळ यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना शिक्रापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु उपचारीपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक कार तेथेच सोडून फरार झाला आहे.

सदर झालेल्या अपघातात दत्तात्रय सोनबा भुजबळ (वय ५२) व मोहिनी अतुल भुजबळ (वय २४, दोघे रा. टेल्को कॉलनी, आंबेगाव बुद्रुक, मूळ रा. टाकळसिंग ता. आष्टी, जि. बीड) यांचा मृत्यू झाला  असून याबाबत राजू सोनबा भुजबळ (रा. डोंगरवस्ती, सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे, मूळ रा. टाकळसिंग ता. आष्टी जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे करत आहे.

Web Title: daughter-in-law died along with her father-in-law at Kasari Phata, on Pune-Nagar road accident; The driver absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.