भीमा नदीला पूर : दौंड व शिरुरचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 02:24 PM2019-08-05T14:24:37+5:302019-08-05T14:25:14+5:30
शिरुर व दौंडचा संपर्क भीमा नदीला आलेल्या पुरामुळे तुटला आहे. पारगाव ता दौंड येथील पुल पाण्याखाली गेलेला आहे. पारगाव,देलवडी,पिंपळगाव,हातवळण परिसरामध्ये भीमा नदी व मुळा-मुठा नदीच्या पुरामुळे शेती पिके पाण्याखाली गेली आहेत.
केडगांव : शिरुर व दौंडचा संपर्क भीमा नदीला आलेल्या पुरामुळे तुटला आहे. पारगाव ता दौंड येथील पुल पाण्याखाली गेलेला आहे. पारगाव,देलवडी,पिंपळगाव,हातवळण परिसरामध्ये भीमा नदी व मुळा-मुठा नदीच्या पुरामुळे शेती पिके पाण्याखाली गेली आहेत.
नांनगाव , वडगाव रासाई,राहु,उंडवडी हे पूल वाहतुकीसाठी बंद केले असून भीमा नदी व मुळा मुठा नदीचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे शहरातील शाळांना सोमवारी सुट्टी देण्यात आली होती. नदीकाठची ऊस , मका आदी पिके पिकांमध्ये पाणी साचले असून बहुतांशी शेतकऱ्यांनी विद्युत पंप सुरक्षित स्थळी हरवल्या हलवले आहेत. परिसरातील अनेक गावांमधून हौशी पर्यटक पाणी पाहण्यासाठी नदीकिनारी जमा होत आहेत.परिसरातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.रात्री अजुनही पिके पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. देलवडी येथील दत्तात्रेय शेलार, कालिदास शेलार व किसन शेलार यांची घरे पाण्याखाली गेली आहेत.