दौंड बाजार समिती निकाल: थोरातांच्या गडात कुलांचा शिरकाव; दोन्ही गटांचे ९-९ उमेदवार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 05:29 PM2023-04-29T17:29:22+5:302023-04-29T17:31:47+5:30

राहुल कुल समर्थकांनी गुलालाची उधळण करुन शहरातून राहुल कुल यांची मिरवणूक काढली...

Daund Bazar Samiti Election Results apmc 9 candidates from both groups won | दौंड बाजार समिती निकाल: थोरातांच्या गडात कुलांचा शिरकाव; दोन्ही गटांचे ९-९ उमेदवार विजयी

दौंड बाजार समिती निकाल: थोरातांच्या गडात कुलांचा शिरकाव; दोन्ही गटांचे ९-९ उमेदवार विजयी

googlenewsNext

दौंड (पुणे) :दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची झाली. विशेष म्हणजे माजी आमदार रमेश थोरात यांच्या २५ वर्षाच्या सत्तेला आमदार राहूल कूल यांनी आव्हान दिले. अखेर सभासदांनी दोन्ही गटांना खेळवत ९-९ जागा मिळवून दिल्या. त्यामुळे थोरातांच्या गडावर कुलांचा शिरकाव झाला असून भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत कुलांना ही बाब जमेची ठरणार आहे. राहुल कुल समर्थकांनी गुलालाची उधळण करुन शहरातून राहुल कुल यांची मिरवणूक काढली.

सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली ग्रामपंचायत, व्यापारी आडते, हमाल मापाडी या मतदारसंघात मोठ्या फरकाने उमेदवार विजयी झाले तर सोसायटी गटात घासून लढत झाली. सुरुवातीला ग्रामपंचायत मतदारसंघाचे चारही उमेदवार भाजपा आणि मित्र पक्ष पुरस्कृत राहुल कुल गटाच्या जनसेवा विकास पॅनलला चार जागा मिळाल्या त्यानंतर पाचवी जागा हमाल मापारी मतदारसंघाची कुल गटाला मिळाल्याने राष्ट्रवादी पुरस्कृत रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी निकालाची उत्कंठा शिगेला पोहचली होती.

एकंदरीत जस जशी मतमोजणी होत गेली त्यानुसार कुल थोरात या दोन्हीही गटाला प्रत्येकी नऊ नऊ अशा समसमान जागा मिळाल्या दरम्यान कुठल्याही पॅनलला वर्चस्व मिळाले नाही सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीनंतर दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेमकी कुठल्या गटाचे वर्चस्व राहील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र सभापती आणि उपसभापती सोडत पद्धतीने निघतील अशी एकंदरीत परिस्थिती राहील. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंध हर्षित तावरे यांनी काम पाहीले.

विजय उमेदवार कंसात मिळालेली मते
सहकारी संस्था मतदार संघ

पोपटराव ताकवणे ( ७८६ ), गजिनाथ आटोळे (७३५), सचिन शेळके ( ७३५) ,संतोष आखाडे (७२९), शरद कोळपे,(७२५), बापूसाहेब झगडे (७२४), भारत खराडे ( ७१९) ,वर्षा मोरे ( ७८१), गीतांजली शिंदे ( ७५८), जीवन मेत्रे ( ७८६) , बाळासाहेब शिंदे (७८३).
ग्रामपंचायत मतदार संघ

गणेश जगदाळे ( ५१२), अतुल ताकवणे ( ४८७), राहुल चाबुकस्वार (४८६) , अशोक फरगडे ( ५०१).
व्यापारी आडते मतदारसंघ

संपत निंबाळकर ( १०१), सुनील निंबाळकर ( १००)
हमाल मापाडी मतदारसंघ

कालिदास रुपनवर ( २३)
२९ दौंड
दौंड येथे राहुल कुल यांची काढण्यात आलेली जल्लोष मिरवणूक.

Web Title: Daund Bazar Samiti Election Results apmc 9 candidates from both groups won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.