दौंडच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:02+5:302021-05-20T04:12:02+5:30

-- दौंड : दौंड परिसरातील रेल्वे कर्मचाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती सदस्य विकास ...

Daund railway employees should take advantage of vaccination | दौंडच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा

दौंडच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा

Next

--

दौंड : दौंड परिसरातील रेल्वे कर्मचाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती सदस्य विकास कदम यांनी केले. येथील रेल्वे रुग्णालयात लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी विकास कदम बोलत होते.

रेल्वे रुग्णालयात रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लसीकरण करण्यात यावे, याबाबत शासनाकडे एप्रिल महिन्यापासून पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.

कदम म्हणाले की, शासनाने मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध करावी की, जेणेकरुन ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करता येतील. परिणामी कोरोनाची संख्या घटण्यास मदत होईल.

याप्रसंगी नगर परिषदेतील गटनेते बादशाभाई शेख, नगरसेवक इंद्रजित जगदाळे, नगरसेवक वसीम शेख, गटविकास आधिकारी अजिंक्य येळे, डॉ. निरंजन, डॉ. सप्तर्षी, डॉ. एम. विशाली, संतोष बाबर तसेच रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

--

चौकट

लसीकरणाचा भार कमी होईल

--

रेल्वे कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे यांनी देखील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती. एकंदरीतच रेल्वे रुग्णालयात लसीकरण सुरू झाल्याने उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरणाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.

--

फोटो / दौंड रेल्वे रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या शुभारंभप्रसंगी मार्गदर्शन करताना पंचायत समिती सदस्य विकास कदम.

Web Title: Daund railway employees should take advantage of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.