दौंडचा जुना धोकादायक रेल्वेपूल पाडण्यास सुरुवात

By Admin | Published: June 29, 2015 11:37 PM2015-06-29T23:37:58+5:302015-06-29T23:37:58+5:30

दौंड रेल्वे स्थानकातील धोकादायक जुना पूल तोडण्यास सुरुवात झाली आहे. सदरचा पूल धोकादायक असून हा पूल केव्हाही कोसळून जीवितहानी होऊ शकते.

The Daund started to break the old dangerous track | दौंडचा जुना धोकादायक रेल्वेपूल पाडण्यास सुरुवात

दौंडचा जुना धोकादायक रेल्वेपूल पाडण्यास सुरुवात

googlenewsNext

दौंड : दौंड रेल्वे स्थानकातील धोकादायक जुना पूल तोडण्यास सुरुवात झाली आहे. सदरचा पूल धोकादायक असून हा पूल केव्हाही कोसळून जीवितहानी होऊ शकते. या आशयाचे वृत्त लोकमतने ५ जून रोजी दिले होते. या वृत्ताची दखल घेत रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा पूल काढण्याच्या हालचालींना सुरुवात केली. त्यानुसार सोमवार (दि.२९) रोजी हा पूल तोडण्यास सुरुवात केली आहे.
हा पूल प्रवाशांच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी सोईचा होता. मात्र अलिकडच्या काळात हा पूल धोकादायक झाला होता. तसेच सदरचाा पूल रहदारीसाठी धोकेदायक असल्याचा सूचना फलक गेल्या वर्षी रेल्वे प्रशासनाने लावला होता. मात्र सोईसाठी प्रवाशी या पूलावरुन ये जा करीत होते. नव्याने उभारलेला उंच पूल हा प्रवाशांसाठी गैरसोयीचा होता. या पूलाला ५२ पायऱ्या आहेत. (वार्ताहर)

संपूर्ण पूल गंजला होता
-जुना पूला हा धोकादायक होताच हा पूल पाडत असताना पूलाच्या पायऱ्या आणि खांब पूर्णपणे गंजलेले होते. तर काही ठिकाणी हा पूल झिजलेला असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा पूल केव्हाही कोसळ वला असता, परिणामी पूल काढल्यामुळे धोका टळला असून प्रवाशी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच गेल्या तीन वर्षांपूर्वी पावसाळ््यात या पूलाला विद्युत तारांच्या तांत्रिक बिघाडामुळे पूलात विद्युत प्रवाह सुरु झाला होता. मात्र रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यांच्या सत्कतेमुळे धोका टळला, रेल्वे कर्मचारी, पोलीस, रेल्वे सुरक्षाबल यांनी पूलाला वेढा दिल्याने अनर्थ टळला. दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत केल्यानंतर हा पूल कार्यरत झाला होता.

अडचणीत अडचण
प्रवाशांच्या सोईसाठी नवीन पुलाला लिफ्ट बसविण्यात आलेल्या आहे. त्यामुळे लिफ्टद्वारे प्रवाशी या पूलावरुन ये जा करु लागले आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत एक लिफ्ट बंद असल्याने प्रवाशांना नवीन पूलाच्या पायऱ्या चढून जावे लागत आहे. त्यातच जुना पूल पाडल्याने आता नवीन पूलावर प्रवाशांची दमछाक सुरु झाली आहे. त्यामुळे अडचणीत अडचण, निर्माण झाली असल्याने सदरची लिफ्ट तातडीने सुरु करावी, की जेणे करुन प्रवाशांची दमछाक थांबेल, अशी मागणी प्रवाशी वर्गातून पुढे आली आहे.

Web Title: The Daund started to break the old dangerous track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.