दौंड तालुक्यात कोरोनाच्या तांडवाचे उग्र रूप धारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:06+5:302021-04-21T04:11:06+5:30
गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्या वेळी आर्थिक मदतीसह अन्नधान्याची आर्थिक मदतही देण्यात ...
गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्या वेळी आर्थिक मदतीसह अन्नधान्याची आर्थिक मदतही देण्यात येत होती. काही ठिकाणी तर अन्नछत्र सुरू केल्याचे दिसून येत होते. शेकडो किलोमीटर पायी जाणाऱ्या परप्रांतीयांसाठी अनेक जण देवदूत ठरले होते. यात राजकीय आणि सामाजिक संघटनांचा मोठा सहभाग होता. दौंड तालुक्यात मदतीसाठी मदत देणारे हात पुढे सरसावले होते. परंतु आता मात्र त्याउलट परिस्थिती निर्माण झाली असताना राजकीय आणि सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणात मदतीसाठी पुढे आल्याचे दिसत नाही. गतवर्षीपेक्षा या वर्षी मृत्यू आणि कोरोना संसर्गाची संख्या काही पटीने अधिक आहे. संचारबंदीच्या नियमांपेक्षाही लोकांना आज रोजी संसर्गाची भीती अधिक आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या घरातच आहेत.
--
चौकट -१
कार्यालयांत कोविड सेंटर सुरू करण्याची गरज
---
दौंड तालुक्यात आज पुणे-सोलापूर रोडवर अनेक ठिकाणी विवाहासाठी सुसज्ज मंगल कार्यालय उभारण्यात आले आहेत. मात्र आज हे कार्यालय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली आहेत. जर ही कार्यालये प्रशासन विभागाने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी देखील रूग्णांना बेड उपलब्ध करून देऊन या ठिकाणी देखील चांगल्या प्रकारे मोकळ्या वातावरणात उपचारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था होऊ शकते. वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरु आहेत.
---
कोट-१
प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ म्हणाल्या की, दि. १९ एप्रिलपर्यंत दौंडच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ५ हजार ६१६ असून यामध्ये एकूण उपचारानंतर बरे झालेली रुग्णांची संख्या ४ हजार २४७ इतकी असून, आजपर्यंत दौंड तालुक्यात ६९ रुग्ण मृत्यू झाले असून सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १३०० आहे. रुग्णांच्या तुलनेत बेडची संख्या अपुरी पडत असल्याने उपचारास अडचणी होत आहेत.
डॉ. सुरेखा पोळ, प्राथमिक
--